वायरी-तारकर्ली बंदर रस्त्यासाठी मालवणात बापार्डेकर यांचे उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वायरी-तारकर्ली बंदर रस्त्यासाठी मालवणात बापार्डेकर यांचे उपोषण
वायरी-तारकर्ली बंदर रस्त्यासाठी मालवणात बापार्डेकर यांचे उपोषण

वायरी-तारकर्ली बंदर रस्त्यासाठी मालवणात बापार्डेकर यांचे उपोषण

sakal_logo
By

वायरी-तारकर्ली बंदर रस्त्यासाठी
मालवणात बापार्डेकर यांचे उपोषण
बांधकाम विभागाकडून दखलः २४ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ : वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर या मार्गावरील केळबाई मंदिर ते वायरी या उर्वरित रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी पूर्व इशाऱ्यानुसार उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालयासमोर तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे कोकण विकास आघाडी मुंबई सचिव सुरेश बापार्डेकर यांनी बेमुदत उपोषण छेडले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी संबंधित रस्ताकाम तात्काळ चालू करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले असून २४ मेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने बापर्डेकर यांनी उपोषण स्थगित केले.
मालवण-देवबाग मार्गावरील वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली बंदर या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, यासाठी पत्रव्यवहार केल्यावर हे काम सुरु झाले. मात्र, या मार्गावरील केळबाई मंदिर ते वायरी या उर्वरित रस्त्याचे काम अर्धवट राहिलेले असून हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या रस्त्याची साईडपट्टी खराब झालेली आहे. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी बापर्डेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करून १५ मेपर्यंत काम न झाल्यास १७ मेपासून आमरण उपोषणास बसू, असा इशारा दिला होता. मात्र, हे काम न झाल्याने सुरेश बापर्डेकर यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण छेडले. यावेळी सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी बापर्डेकर यांची भेट घेऊन या रस्त्याचे काम तात्काळ सुरुवात करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास देण्यात आले आहेत, असे सांगत 24 मेपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे बापर्डेकर यांनी उपोषण स्थगित केले.