
रत्नागिरी ः क्राईम पट्टा
पान 3 साठी
मद्य प्राशन करणाऱ्या दोघांवर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील आठवडा बाजार येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोघा संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुनील पावसकर (वय ५८) व उपेंद्र वारंग अशी संशयितांची नावे आहेत. हा प्रकार बुधवारी (ता. १७) रात्री साडेआठच्या सुमारास आठवडा बाजार येथे निदर्शनास आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसपथक पेट्रोलिंग करत असताना संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना सापडले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
----
जाकादेवी येथे मटका अड्ड्यावर छापा
रत्नागिरी ः तालुक्यातील जाकादेवी-बाजारपेठ येथील मेडिकल स्टोअर्सच्या पाठीमागे मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उमेश धोडू मटकर (वय ५०) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार गुरूवारी (ता. १८) दुपारी साडेबाराच्या सुमारास जाकादेवी बाजारपेठ येथे निदर्शनास आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित जुगार स्वतःच्या फायद्यासाठी खेळवत असताना सापडला. पोलिसांनी चौकशी करून त्याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.