1 किलो अंमली पदार्थ जप्त मात्र संशयित फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

1 किलो अंमली पदार्थ जप्त मात्र संशयित फरार
1 किलो अंमली पदार्थ जप्त मात्र संशयित फरार

1 किलो अंमली पदार्थ जप्त मात्र संशयित फरार

sakal_logo
By

पान १ साठी

०३८४९

एक किलो अंमली पदार्थ जप्त
रत्नागिरीत कारवाई; संशयित पसार; मोपेडसह दोन मोबाईल जप्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली असून, शहरातील परटवणे येथील नदीकिनारी केलेल्या कारवाईत १ किलो ७० ग्रॅम अंमली पदार्थ, एक दुचाकी, दोन मोबाईल, दोन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, पॅकिंग पाऊच असे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे; मात्र पोलिसांचा सुगावा लागताच सराईत गुन्हेगाराने पोलिस पथकाला गुंगारा दिला.
हेमंत पाटील असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १८) सायंकाळी परटवणे नदीकिनारी घडली. शहर पोलिस ठाणे यांच्या गोपनीय माहितीनुसार, पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक, मनोज भोसले तसेच परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक डॉ. समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक गठित करण्यात आले आहे.
या पथकामार्फत शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार हेमंत पाटील हा दुचाकी (क्र. एमएच ०८ एए ८९१९) घेऊन शहरातील शिवाजीनगर हायस्कूल रोड व परिसरामध्ये अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता; मात्र अधिक शोध घेताना परटवणे येथील खाडी भागाजवळ असलेल्या झाडीझुडपालगत एक पांढऱ्या रंगाच्या दुचाकीसह एकजण उभा असलेला दिसून आला. पोलिस आपल्या दिशेने येत असताना पाहून हेमंत पाटील याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला; परंतु संशयित पाटील तिथून पळून जाण्यास यशस्वी झाला; मात्र पळताना त्याचे दोन्ही मोबाईल खिशातून खाली पडले तसेच त्याने आपली दुचाकी व विक्रीकरिता सोबत आणलेले अंमली पदार्थ व साहित्य तेथेच टाकून पळाला.
घटनास्थळी पोलिसांनी १ किलो ७० ग्रॅम अंमली पदार्थ, एक पांढऱ्या रंगाची दुचाकी, २ मोबाईल, २ इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, पॅकिंगकरिता लागणारे पाऊच व साहित्य असे पंचांसमक्ष जप्त केले. हेमंत पाटील विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत पाटील याचा अधिक शोध पोलिसांकडून घेण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई शहर पोलिस ठाणे, विशेष पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.