तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

sakal_logo
By

३७ (पान ३ साठी)


-rat१९p३६.jpg ः
२३M०३८१६
श्रेयस ढवळ
----------------
विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू

संगमेश्वर, ता. १९ ः नदीवर आंघोळीला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा काजळी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १६) दुपारी घडली आहे. संगमेश्वर तालुक्यातील तिवरे ढवळवाडीतील श्रेयस रवींद्र ढवळ (वय १७) हा काजळी नदीवर आंघोळीला गेला असता बुरंबी कोंडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
श्रेयस हा उन्हाळी सुट्टी असल्याने गावी आला होता. तो रत्नागिरीमध्ये शिक्षण घेत होता. यंदा अकरावी परीक्षा पास होऊन बारावीला गेला होता. अत्यंत मनमिळाऊ व हुशार विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असे. त्याला एक बहीण आहे. त्याच्या आकस्मिक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला असून, त्याच्या मृत्यूची खबर मिळताच साखरपा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची खबर साखरपा पोलिसांना मिळताच पोलिस कर्मचारी वैभव कांबळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.