डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना मुदतवाढ देण्याची मागणी

डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना मुदतवाढ देण्याची मागणी

डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना
मुदतवाढ देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः येथील कुटीर रुग्णालयाचे स्त्री-रोग तज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना तात्काळ दोन वर्षाची मुदत द्या, अशी मागणी येथील माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व सहकारी नगरसेवकांनी केली आहे. याबाबत योग्य तो निर्णय घ्या; अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत साळगावकर यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
त्यात म्हटले आहे की, येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. दुर्भाटकर यांची मुदत ३१ मे रोजी संपत आहे. ते वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. परंतु, गेली २२ वर्षे त्यांनी शहरातील लोकांना दिलेली सेवा लक्षात घेता त्यांना दोन वर्षाची आणखी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी श्री. साळगावकर व माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, उमाकांत वारंग, विलास जाधव, सुरेश भोगटे यांनी केली आहे. यापूर्वी या ठिकाणी कार्यरत असलेले डॉ. उत्तम पाटील यांनाही अशाप्रकारेच मुदतवाढ देण्यात आली. त्याच धर्तीवर आता डॉ. दुर्भाटकर यांना सुद्धा मुदतवाढ देण्यात यावी; अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी पालकमंत्री चव्हाण यांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com