वीज चोरी प्रकरणी कणकवलीत एकावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज चोरी प्रकरणी कणकवलीत एकावर गुन्हा
वीज चोरी प्रकरणी कणकवलीत एकावर गुन्हा

वीज चोरी प्रकरणी कणकवलीत एकावर गुन्हा

sakal_logo
By

वीज चोरी प्रकरणी कणकवलीत एकावर गुन्हा

कणकवली,ता. १९ ः शहरातील बाजारपेठेतील ढालकाठी परिसरात वीजेची चोरी केल्याप्रकरणी एकावर आज गुन्हा दाखल करण्यात आला. मयूर विजय खुटाळे (रा. कणकवली, ढालकाठी), असे संशयिताचे नाव आहे. १५ फेब्रुवारी ते १७ मे दरम्यान चोरीची ही घटना घडली असून एकूण १४९१ युनिटचे ३५ हजार ६१८ रूपये इतकी वीज चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे सहाय्यक अभियंता सागर शिवाजी कांबळे (वय ४६ रा.कणकवली) यांनी आज येथील पोलिसांत फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, वरीष्ठ कार्यालयाने १० वीजपुरवठा कायम खंडीत ग्राहकांची यादी पडताळणीसाठी दिली होती. यादीमध्ये मृत धोंडू कृष्णा खुटाळे (रा. ढालकाठी, कणकवली) या ग्राहकाचाही समावेश होता. त्यांच्या मिटरची पाहणी करण्यात आली. त्यांची थकबाकी १ लाख ९० हजार रुपये आहे. शिवाय पुर्वीच वीज पुरवठा खंडीत आहे. असे असताना वीज सुरू असल्याचे निदर्शनास आले. या विजेचा वापर धोंडू यांचा नातू मयुर व त्यांचे कुटुंबीय करत असल्याचे निदर्शनास आले. दंडनिहाय वीज चोरीबाबतचे एकूण १४९१ युनिटचे ३५ हजार ६१८ इतके बिल मयूर यांना दिले आहे. मयुर विरोधात भारतीय विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५ प्रमाणे कायदेशीर कारवाई केली आहे.