
टोलमुक्त कृती समितीची कुडाळात तातडीची बैठक
टोलमुक्त कृती समितीची
कुडाळात तातडीची बैठक
कुडाळ, ता. १९ः अन्यायकारक टोल नाका सुरू करू न देण्याबाबत आंदोलनाची पुढील दिशा व गतिमान वाटचाल नेमकी कोणती असावी? यावर सखोल चर्चा आजच्या तातडीच्या बैठकीत करण्यात आली.
ओसरगाव टोल नाका एक जूनपासून सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समिती, सिंधुदुर्गची तातडीची बैठक येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे आयोजित केली होती. गेले सहा महिने समितीच्या नियोजनबध्द हालचाली, विविध विभागाकडे केलेल्या कायदेशीर पत्रव्यवहार, एकजुटीची ताकद, सर्वसामान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेले पाठबळ, सर्व राजकीय पक्षांनी दिलेला बिनशर्त पाठिंबा यामुळे टोलनाका संबंधित यंत्रणेला चालू करू दिलेला नाही. ही बाब अतिशय महत्त्वाची असून यापुढेही कोणत्याही परिस्थितीत हा अन्यायकारक टोल नाका सुरू करू देणार नाही, यासाठीच आंदोलनाची पुढील दिशा व गतिमान वाटचाल नेमकी कोणती असावी? यावर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. तरी समितीचे प्रमुख पदाधिकारी, सदस्य व अन्यायग्रस्त नागरिकांनी सभेत उपस्थित राहून सहकार्य करावे, असे कृती समिती अध्यक्ष द्वारकानाथ घुरये, सचिव मनोज वालावलकर यांच्या वतीने आवाहन केले आहे.