रेल्वेने प्रवास करणाऱ्या
महिलेचे दागिने चोरीस

रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीस

रेल्वेने प्रवास करणाऱ्या
महिलेचे दागिने चोरीस

कुडाळ स्थानकादरम्यान घटना

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः केरळ ते अहमदाबाद असा रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला गेले. ही घटना कुडाळ रेल्वे स्थानका दरम्यान घडली असावी, असा अंदाज तिचे पती सोमन कृष्णन नायर यांनी व्यक्त केला असून येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुमारे ५१ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सोमन कृष्णन नायर हे आपल्या कुटुंबीयांसोबत केरळ येथे भावाच्या गृहप्रवेशासाठी गेले होते. हे सर्व कुटुंबीय हा कार्यक्रम आटपून पुन्हा अहमदाबाद येथे केरळवरून तिरूनलवेल्ली ते जामनगर या रेल्वेमधून प्रवास करत होते. त्यांच्या पत्नीने ताब्यातील ब्रेसलेट, नेकलेस, चैन अशा सोन्याच्या वस्तू बॅगमध्ये ठेवल्या होत्या. मडगाव येथे गाडी आल्यावर या बॅगेमध्ये हे सोन्याचे दागिने होते. दरम्यान, ही गाडी कुडाळ रेल्वे स्थानक येथे आल्यावर त्यांनी आपली बॅग शोधली असता ती सापडली नाही. दरम्यान, ही बॅग तिकीट तपासणीस यांच्याकडे असल्याचे समजले; मात्र त्यात दागिने सापडले नाहीत. या बॅगेमध्ये सुमारे ५१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते. याबाबत येथील पोलिस ठाण्यात सोमन नायर यांनी तक्रार दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com