
प्रभातफेरीने आरंभ तर समारोपाला नाटकाचे आयोजन
७ (पानासाठी)
rat२०p७.jpg ः
२३M०३९१९
रत्नागिरी ः अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेतील विजेता नार्वेकरवाडी यंगस्टार संघ.
पनोरमधील मंडळाचा रौप्य महोत्सव
समारोपाला नाटकाचे आयोजन ; मनोरंजनासाठी मंडळाची स्थापना
रत्नागिरी, ता. २०ः तालुक्यातील हर्चे येथील पनोर-खालचीवाडीच्या मौजमस्ती धमाका ज्ञान, कला, क्रीडा मंडळाच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्त मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेला वाडीतील कष्टकरी मंडळींना आनंद, मनोरंजन मिळावे या उद्देशाने स्थापन केलेल्या या संस्थेतर्फे प्रतिवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. यावर्षीही प्रभातफेरीने मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षाचा आरंभ केला तर समारोप लेखक सूर्यकांत सावंत लिखित आणि राजा वाडेकर दिग्दर्शित ‘सांभाळ तुझं सौभाग्य’ या नाटकाने केला. त्यापूर्वी मानाच्या मौजमस्ती धमाका चषकाचे अनावरणही उत्साहात झाले.
या वेळी वाडीचे अध्यक्ष जनार्दन वाडेकर, सुधीर वाडेकर, ग्रामपंचायत सदस्य रमाकांत वाडेकर, ग्रामस्थ बाळकृष्ण तरळ, गणपत वाडेकर, दाजी वाडेकर, विलास वाडेकर, प्रभाकर वाडेकर, संजय वाडेकर, शिवराम वाडेकर, तुकाराम तोस्कर तसेच एकता महिला मंडळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या निमित्त आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत १६ संघांचा समावेश होता. या स्पर्धेचे विजेतेपद नार्वेकरवाडी यंगस्टारने पटकावले तर साईगौरव पनोरची खालचीवाडी यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. उत्कृष्ट फलंदाज नीलेश नार्वेकर, मालिकावीर संकेत शेडेकर, गोलंदाज अभिजित धनावडे, क्षेत्ररक्षक प्रितम तेंडुलकर, शिस्तबद्ध एकता तांबेवाडी तसेच विजेत्या आणि उपविजेत्या संघास रोख बक्षीस आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी हर्चे हायस्कूलचे अध्यापक व्ही. पी. पाटील यांचा सेवानिवृत्तीपर सन्मान केला. महिलांसाठी आयोजित संगीतखुर्ची स्पर्धेतील विजेत्या रेवती वाडेकर, उपविजेत्या वर्षा वाडेकर यांना रोख बक्षीस आणि पैठणी प्रदान करण्यात आली. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या कलावंत मुलांना मंडळाच्यावतीने पारितोषिके देण्यात आली. या वेळी सरपंच दीप्ती तरळ, उपसरपंच संजय नवाथे, पोलिस पाटील दीपक तरळ, हर्चे हायस्कूलचे माजी प्राचार्य विलास पाटील, व्ही. पी. पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन सुहास वाडेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी मेहनत घेतली.