काजू बागेला आग लागून 
फणसवडेत लाखोंची हानी

काजू बागेला आग लागून फणसवडेत लाखोंची हानी

03968
फणसवडे ः येथे आगीत भस्मसात झालेली काजू बाग.

काजू बागेला आग लागून
फणसवडेत लाखोंची हानी
सावंतवाडी, ता. २० ः काजूच्या बागेला अचानक आग लागून सुमारे ४०० काजूची कलमे भस्मसात झाल्याची घटना फणसवडे गावात काजीचा पाचा येथे शुक्रवारी (ता. १९) घडली. यात छायाचित्रकार तथा युवा प्रगतशील बागायतदार प्रभाकर गावडे यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. आठ वर्षे अथक परिश्रम करून बनविलेली संपूर्ण काजू बाग या घटनेत भस्मसात झाल्याने गावडे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
फणसवडे येथील गावडे यांची काजू कलमे असलेली ही बाग गेली सात-आठ वर्षे काबाडकष्ट करून गावडे कुटुंबीयांनी साकारली होती. यंदाच्या हंगामात ती चांगलीच बहरली होती. बागेला आग लागल्याचे समजताच गावडे कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली; मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे बागेतील काजूची सर्व ४०० कलमे भस्मसात झाली. यात गावडे कुटुंबीयांचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. काजू बाग बहरलेली असताना आगीत जळाल्याने गावडे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. कृषी पर्यवेक्षक वाय. सी. सावंत, ग्रामसेवक सी. ए. शेडगे, कृषी सहाय्यक टोटावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com