हिंदू महासभेची कार्यकर्त्यांशी चर्चा

हिंदू महासभेची कार्यकर्त्यांशी चर्चा

03951
कोल्हापूर ः कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हिंदू महासभेचे उपाध्यक्ष अनुप केणी व पदाधिकारी.

हिंदू महासभेची कार्यकर्त्यांशी चर्चा

कोकण, पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भेटीगाठी

तळेरे, ता. २० ः हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेशतर्फे कोकण व पश्चिम महाराष्ट्र दौरा करण्यात आला. दिवंगत हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते विलासराव खानविलकर यांच्या लांजा येथील निवासस्थानी भेट देऊन सांत्वन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण दौऱ्यात विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेशच्या माजी महिला अध्यक्षा प्रमिला गंभीरराय यांची भेट त्यांच्या शेजवली येथील निवासस्थानी घेण्यात आली. त्यांच्या पुरातन शिवमंदिर गंभीरेश्वर देवस्थानाच्या संघर्षाबाबत चर्चा करण्यात आली. कोल्हापूर येथील हिंदुसभा कार्यकर्त्यांची भेट घेऊन महासभेच्या पुढील कार्याबाबत चर्चा झाली. सांगलीचे हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते अरुण गडचे यांच्या स्वास्थ्याची विचारपूस करून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याबाबत चर्चा झाली. हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते अधिवक्ता गोविंद गांधी यांच्या सातारा येथील निवासस्थानी पंडित नथुराम गोडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सातारा येथील सोळशी येथे हिंदू महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनराजजी जगताप यांना शनेश्वर कृतज्ञता नाट्यभूषण धर्मरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमानंतर तीन दिवसांचा दौरा झाला. या दौऱ्याला हिंदू महासभेचे उपाध्यक्ष अनुप केणी, हिंदू महासभा कार्यवाह दत्ता सणस, हिंदू महासभा कार्यालयीन कार्यवाह हरीश शेलार, हिंदू महासभा मुंबई सायन धारावी येथील अधिवक्ता प्रवीण गर्जे, मारुती वगरे आदींनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com