
-रत्नागिरी पालिका कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा लाभ
१२ (पान २ साठी)
कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा लाभ
रत्नागिरी पालिका ; २३ निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा
रत्नागिरी, ता. २० ः रत्नागिरी पालिकेच्या निवृत्त २३ कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्यातील जगण्याचा आशेचा किरण मिळाला आहे. शासनाने सातव्या वेतन आयोगाच्या थकित तिसऱ्या हप्त्याचे १ कोटी १४ लाख ४२ हजार रुपये पालिकेला वितरित करण्यात आले आहेत.
निवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे २ कोटी रुपये रत्नागिरी नगरपालिकेकडून मिळणे बाकी आहेत. जिल्ह्यातील रत्नागिरीसह चिपळूण, दापोली, खेड, राजापूर नगरपालिका आणि मंडणगड नगर पंचायतीला सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यापोटी २ कोटी ७५ लाख ४६ हजार हजार रुपये वितरित झाले आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी पालिकेतील एकूण २३ निवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान, रजा विक्री, रजा रोखीकरणाचे सुमारे २ कोटी रुपये द्यायचे आहेत. काही कर्मचाऱ्यांचे या रकमेची वाट पाहत आयुष्य संपले. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाचा जो काही सातवा हप्ता आला आहे त्यातून या निवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीत रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा हा हप्ता त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीत जमा होणार आहे.
सातवा वेतन आयोग २०१६ पासून लागू झाला. या आयोगाच्या तिसरा हप्ता जुलै २०२१ मध्ये देय होता. हा रखडलेला हप्ता आता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड, राजापूर नगरपालिका आणि मंडणगड नगर पंचायतीला सातव्या वेतन आयोगाच्या तिसऱ्या हप्त्यापोटी २ कोटी ७५ लाख ४६ हजार रुपये वितरित झाले आहेत. रत्नागिरी पालिकेला १ कोटी १४ लाख ४२ हजार रुपये, चिपळूण ८५ लाख ९ हजार, दापोली ७ लाख ७८ हजार, खेड ३१ लाख ९३ हजार, राजापूर ३ लाख ५४ हजार, मंडणगड नगर पंचायतीला ७५ हजार रुपये मिळाले आहेत. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.