वाटद कवठेवाडी शाळेस जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाटद कवठेवाडी शाळेस जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान
वाटद कवठेवाडी शाळेस जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान

वाटद कवठेवाडी शाळेस जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

१४ (पान २ साठी)


-rat२०p११.jpg-
२३M०३९४२
रत्नागिरी ः वाटद कवठेवाडी शाळेस जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करताना पालकमंत्री उदय सामंत.
--------
वाटद कवठेवाडी शाळेला पुरस्कार


रत्नागिरी, ता. २० ः रत्नागिरी जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार यावर्षी रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेस पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या लोकनेते शामराव पेजे सभागृहात हा कार्यक्रम झाला. ग्रामीण भागात सातत्याने आणि सर्वांगीण गुणवत्ता विकास करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करत कार्य करणाऱ्या प्राथमिक शाळांना पुरस्कार प्रदान करून प्रोत्साहन दिले जाते. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वीच सन २०२२-२३ या वर्षीचे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या गुणवत्तापूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेत यावर्षीचा आदर्श शाळेचा सन्मान पटकावत यश संपादन केले.
विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास व्हावा यासाठी शाळेने विविध स्पर्धा, बौद्धिक उपक्रम, स्पर्धा परीक्षा, संस्कारयुक्त शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पर्यावरण संवर्धन, परसबाग, वृक्षसंवर्धन यांसारखे अनेक उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांची पुनरावृत्ती केली जाते. यासोबतच शाळा आणि पालक-ग्रामस्थ यांच्यात सुसंवाद साधून मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात.

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख अनिल पवार, वाटद कवठेवाडी शाळेच्या जीर्णोद्धार समिती अध्यक्ष अप्पा धनावडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास बारगुडे, उपाध्यक्षा वैशाली कुर्टे, रमेश तांबटकर, सुवर्णा धनावडे, पूनम धनावडे, प्रविणा धनावडे, प्रेरणा धनावडे, शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे, उपशिक्षक गोविंद डुमनर यांच्यासह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या वेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.