मत्स्यसंपदा योजनेंतर्गत लाभार्थीस इन्सुलेटेड वाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मत्स्यसंपदा योजनेंतर्गत
लाभार्थीस इन्सुलेटेड वाहन
मत्स्यसंपदा योजनेंतर्गत लाभार्थीस इन्सुलेटेड वाहन

मत्स्यसंपदा योजनेंतर्गत लाभार्थीस इन्सुलेटेड वाहन

sakal_logo
By

03960
मालवण ः इन्सुलेटेड वाहन खरेदी केलेल्या राज जाधव याला चाव्या सुपूर्द करताना बाबा परब व अन्य.

मत्स्यसंपदा योजनेंतर्गत
लाभार्थीस इन्सुलेटेड वाहन
मालवण : शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मासळी निर्यातीसाठी जिल्हा बँकेच्या तारकर्ली शाखेकडून कर्ज घेत इन्सुलेटेड वाहन खरेदी केलेल्या लाभार्थी राज जाधव याला आज जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांच्या हस्ते गाडीच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत आहे. यात लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात येत आहे. यात जिल्हा बँकेच्या तारकर्ली शाखेकडून कर्ज घेत मासळी निर्यातीसाठी इन्सुलेटेड वाहन खरेदी केलेल्या लाभार्थी राज जाधव याला आज वाहनाच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी शाखाव्यवस्थापक नारायण चव्हाण, तालुका विकास अधिकारी पूर्णानंद सरमळकर, विकास अधिकारी सूरज गवंडी, स्वप्नील केळूसकर, विक्रांत नाईक आदी उपस्थित होते.
---
03959
मधुसूदन नानिवडेकर

नानिवडेकर स्मृती पुरस्कारासाठी आवाहन
तळेरे ः सुप्रसिद्ध गझलकार, पत्रकार व अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनी २०२२-२३ पर्यंत प्रकाशित झालेल्या मराठी काव्य संग्रहास पुरस्कार देण्यात येणार आहे. नानिवडेकर यांच्या स्मृतिदिनी ११ जुलैला त्याचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन केले जाणार आहे. इच्छुकांनी आपले काव्यसंग्रह २० जूनपर्यंत शैलेश घाडी, वेदांत सोनोग्राफी सेंटर, तेलीआळी, कणकवली या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन सिंधुवैभव साहित्य समुहाच्या अध्यक्षा स्नेहा राणे यांनी केले आहे.