Sat, Sept 23, 2023

बांदेकर महाविद्यालयास ‘अॅक्सेस २०२३’
बांदेकर महाविद्यालयास ‘अॅक्सेस २०२३’
Published on : 20 May 2023, 11:31 am
बांदेकर महाविद्यालयास ‘अॅक्सेस २०२३’
सावंतवाडी,ता.२० ः मुंबईतील अस्मिता अॅकॅडमीतर्फे देण्यात येणारा ''अॅक्सेस २०२३'' पुरस्कार यावर्षी बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयातील अंतिम वर्ष बीएफएच्या विद्यार्थ्यांनी पटकावला. महाविद्यालयातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी ओंकार गुरव, पियुषा भालेराव आणि तन्वी चव्हाण यांनी पुरस्कारावर आपली मोहर उमटवली. त्यांना तुकाराम मोरजकर, सिद्धेश नेरुरकर व प्रा. दिलीप धोपेश्वरकर यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थाध्यक्ष रमेश भाट यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.