निरुपयोगी वस्तू पुनर्वापरासाठी 
वेंगुर्लेत ‘आरआरआर’ केंद्र

निरुपयोगी वस्तू पुनर्वापरासाठी वेंगुर्लेत ‘आरआरआर’ केंद्र

03978
वेंगुर्ले ः ‘आरआरआर’ केंद्राचे उद्‍घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते झाले.

निरुपयोगी वस्तू पुनर्वापरासाठी
वेंगुर्लेत ‘आरआरआर’ केंद्र

वेंगुर्ले, ता. २० ः केंद्र शासनाकडून सूचित केल्यानुसार येथील नगरपरिषदेने ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ या अभियानांतर्गत ‘आरआरआर’ अर्थात ‘रेड्युस, रियुज, रिसायकल’ या केंद्राची स्थापना नगरपरिषद कार्यालय आणि जुनी शिवाजी प्रागतिक शाळा इमारत या ठिकाणी केली आहे. याचे उद्‍घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते नुकतेच झाले. या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना नगरपरिषदेमार्फत तयार करण्यात आलेले एक किलो याप्रमाणे जैविक खत मोफत दिले जाणार आहे.
‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ व ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांच्या घरी असलेल्या जुन्या व वापरात नसलेल्या वस्तू, पादत्राणे, कपडे, प्लास्टिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, बॅग, खेळणी अशाप्रकारच्या निरुपयोगी वस्तूंचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने ‘आरआरआर’ या केंद्राची स्थापना केली आहे. ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’, या ब्रिदवाक्याला अनुसरून नागरिकांनी त्यांच्याकडील निरुपयोगी वस्तू या केंद्रामध्ये जमा करून त्यांना गरज असेल त्या वस्तू घेऊन जाव्यात. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी कंकाळ यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com