राजापूरराजापूर अर्बन बँकच्या शृंगारतळी शाखेचे आज उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूरराजापूर अर्बन बँकच्या शृंगारतळी शाखेचे आज उदघाटन
राजापूरराजापूर अर्बन बँकच्या शृंगारतळी शाखेचे आज उदघाटन

राजापूरराजापूर अर्बन बँकच्या शृंगारतळी शाखेचे आज उदघाटन

sakal_logo
By

१८ (पान २ साठी)

-rat२०p१४.jpg ः

२३M०३९६५
गुहागर ः राजापूर अर्बन बॅंकेच्या शृंगारतळी शाखेची इमारत.
---

राजापूर अर्बन बँकच्या
शृंगारतळी शाखेचे आज उदघाटन

राजापूर, ता. २० ः राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. च्या गुहागर तालुक्यात शृंगारतळी येथे बँकेच्या १२व्या शाखेचा आरंभ सोहळा रविवारी (ता. २१) सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष हनिफ काझी, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे, शृंगारतळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मोहन संसारे उपस्थित राहणार आहेत. शृंगारतळी येथील समर्थ भवन, पहिला मजला, पोस्ट ऑफिसजवळ, बाजारपेठ शृंगारतळी येथे ही बँकेची नवी शाखा सुरू होत आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे सुरू होत असलेली ही शाखा बँकेची बारावी शाखा, तर रत्नागिरी जिल्ह्यातील आठवी शाखा आहे. राजापूर, साखरीनाटे, पाचल, लांजा, रत्नागिरी, देवरूख, जानशीपठार या सात शाखा जिल्ह्यात कार्यरत असून आता शृंगारतळी ही आठवी शाखा रत्नागिरी जिल्ह्यात सुरू होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या तळेरे शाखेसह वैभववाडी, कुडाळ व पडेल अशा चार शाखा कार्यरत आहेत. शाखा तेथे एटीएम या धोरणाप्रमाणे शृंगारतळी शाखेच्या आरंभप्रसंगी तेथील एटीएमचाही आरंभ होणार आहे. शृंगारतळी शाखेच्या आरंभानिमित्त श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन राजापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अनिलकुमार करंगुटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, शृंगारतळी शाखाधिकारी आरिफ कर्णेकर आदींनी केले आहे.