178 चालक, वाहकांना
एसटीकडून ''टीटीएस''

178 चालक, वाहकांना एसटीकडून ''टीटीएस''

संक्षिप्त

१७८ चालक, वाहकांना
एसटीकडून ‘टीटीएस’
कणकवली ः राज्य एसटी कष्टकरी जनसंघाच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग विभागातील १७८ चालक तथा वाहकांना तात्पुरत्या समय वेतन श्रेणीत (टीटीएस) घेण्यात आले आहे. दोन-तीन वर्षांपासून हे आदेश प्रलंबित होते. एसटी कष्टकरी जनसंघ सिंधुदुर्ग विभागाच्या माध्यमातून याबाबत कार्यवाहीची मागणी करत उपोषणाची नोटीस दिली होती. या वेळी विभाग नियंत्रकांनी चर्चेला बोलावून लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग विभाग एसटी प्रशासनाने त्या सर्व कर्मचाऱ्‍यांचे टीटीएसचे आदेश जारी केले. याबाबत विभाग नियंत्रक अभिजित पाटील, विभागीय यंत्र अभियंता वासकर तसेच आस्थापना शाखेतील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी, अधिकाऱ्‍यांचे जनसंघाच्या माध्यमातून अध्यक्ष अनंत (अमित) रावले आणि सचिव गणेश शिरकर यांनी आभार मानले आहेत.

‘भूविकास’च्या कर्मचाऱ्यांना
सात वर्षांचा थकीत पगार
कणकवली ः राज्यातील भूविकास बँकांच्या कर्मचाऱ्‍यांचे सात वर्षे थकीत असलेले पगार व इतर सर्व आर्थिक लाभाची रक्कम कमर्चाऱ्‍यांना दिली आहे. त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने तसेच सातत्याने अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केल्याने न्याय मिळाल्याचे भूविकास बँकेचे कर्मचारी उत्तम राणे, चंद्रकांत सरंगले यांनी सांगितले. गुरुवारी त्यांनी आ. वैभव नाईक यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७१ कर्मचार्‍यांची १४ कोटी ५५ लाख २३ हजार एवढी रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उन्हाळी हंगामासाठी
वेंगुर्लेतून जादा बसेस
वेंगुर्ले ः येथील आगारातून मुंबई-परेल, पुणे, तुळजापूर, बेळगाव अशा लांब एसटी उन्हाळी पल्ल्याच्या एसटी बसेस उन्हाळी हंगामासाठी १५ जूनपर्यंत सुरू करण्यात आल्या आहेत. यात वेंगुर्ले आजरामार्गे बेळगाव सकाळी ०५.१५ वाजता, बेळगाव-वेंगुर्ले सकाळी १० वाजता, वेंगुर्ले-पुणे (आजरा मार्गे) रातराणी सायंकाळी ४ वाजता व पुणे आजरामार्गे वेंगुर्ले पुणे येथून सायंकाळी ७ वाजता, आरोंदा-परळ वेंगुर्ले आगारातून दुपारी ४ वाजता व परळ-आरोंदा परेल येथून दुपारी ४ वाजता, वेंगुर्ले आजरामार्गे तुळजापूर पहाटे ५ वाजता व तुळजापूर-वेंगुर्ले ही तुळजापूर येथून पहाटे ५ वाजता, वेंगुर्ले गगनबावडामार्गे कोल्हापूर ही दुपारी २.३० वाजता व कोल्हापूर-फोंडाघाटमार्गे वेंगुर्ले अशी कोल्हापूरहून सकाळी ६ वाजता, वेंगुर्ले-दाभोली-बावडामार्गे पुण सकाळी ९ वाजता व पुणे-फोंडाघाट-मठमार्गे वेंगुर्ले ही पुणे येथून सकाळी ९ वाजता सुटणार आहे. या सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुमार व बसस्थानक प्रमुख नीलेश वारंग यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com