रत्नागिरी ः ग्रामविकासासाठी 38 ग्रामपंचायतींना 7 कोटी कर्ज

रत्नागिरी ः ग्रामविकासासाठी 38 ग्रामपंचायतींना 7 कोटी कर्ज

पान ५ साठी)

विकासासाठी ३८ ग्रामपंचायतींना ७ कोटी

जिल्हा परिषद योजना : पन्नास टक्के रक्कम भरणा

रत्नागिरी, ता. २० ः जिल्हा परिषदेकडून ग्रामविकास निधीअंतर्गत ३८ ग्रामपंचायतींनी विविध कारणांसाठी कर्ज घेतले आहे. त्यात सुमारे ६ कोटी ९० लाख कर्ज जि. प. स्तरावरून मंजूर करण्यात आले. त्यापैकी गेल्या मार्च २०२३ अखेरपर्यंत घेतलेल्या कर्जाची सुमारे २ कोटी ७० लाख ७५ हजार इतकी मुद्दलाची रक्कम भरणा करण्यात आलेली आहे. मुद्दल आणि व्याज अशी मिळून अजूनही ३ कोटी ७६ लाख ६२ हजार इतकी रक्कम भरणा होणे बाकी आहे.
जिल्हा ग्रामविकास निधीअंतर्गत जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना कर्ज दिले जाते. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधणी, ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता, शॉपिंग सेंटर, मंगल कार्यालय, बंदिस्त गटार, ट्रक्टर खरेदी, सांस्कृतिक भवन आदी कारणांसाठी ग्रामविकास निधीतून २० वर्षांत जिल्हा परिषदेने ६ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. आतापर्यंत त्यापोटी २ कोटी ७० लाख ७५ हजार ९२७ रु. इतकी मुद्दल भरणा केली आहे. जिल्हा परिषदेकडून हे कर्ज ग्रामपंचायतींना परतफेडीच्या मुदतीवर दिले गेलेले आहे. यासाठी हप्ता नियमित व वेळेवर भरणे गरजेचे आहे. हप्ता न भरल्यास वाढीव अडीच टक्के दंडात्मक व्याजाची तरतूद या कर्जामध्ये आहे; मात्र यात अनेक ग्रामपंचायतींची वसुली शून्य टक्के आहे तर काही ग्रामपंचायतींनी ७० टक्क्यांपर्यंत कर्ज भरलेले आहे.

*तालुका*ग्रामपंचायती*एकूण कर्ज (रुपये)
*गुहागर*५*४८ लाख ९० हजार
*लांजा*२*१२ लाख
*राजापूर*१*८ लाख
*दापोली*४*५३ लाख
*मंडणगड*१*२५ लाख
*संगमेश्वर*१*१० लाख
*चिपळूण*८*१ कोटी ३१ लाख
*रत्नागिरी*१५* ३ कोटी १५ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com