बांद्यात ‘आरोग्य’ला सतर्कतेच्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात ‘आरोग्य’ला सतर्कतेच्या सूचना
बांद्यात ‘आरोग्य’ला सतर्कतेच्या सूचना

बांद्यात ‘आरोग्य’ला सतर्कतेच्या सूचना

sakal_logo
By

03983
बांदा ः वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांच्याशी चर्चा करताना सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब व इतर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांद्यात ‘आरोग्य’ला सतर्कतेच्या सूचना

सरपंचांकडून आढावा; ‘गोवर’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २० ः शहरात आळवाडी येथे पाच बालकांना गोवरसदृश लक्षणे आढळल्याने आज सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांची भेट घेत माहिती घेतली. यावेळी सरपंच श्रीमती नाईक यांनी आरोग्य विभागाला सर्वेक्षण करण्याबाबत तसेच सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या.
शहरातील आळवाडी येथील मैदानात सोलापूर जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांनी वस्ती केली असून या वस्तीतील पाच बालकांमध्ये गोवरची लक्षणे आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर सरपंच नाईक, उपसरपंच खतीब यांच्यासह शैलेश केसरकर, विराज परब, शैलेश गवस, प्रवीण परब यांनी डॉ. पटवर्धन यांची भेट घेत त्यांना सूचना दिल्या. यावेळी डॉ. पटवर्धन यांनी संशयित सर्व रुग्णांची प्रकृती उत्तम असून आरोग्य विभागाने आळवाडी परिसरातील ७९ जणांचे आरोग्य सर्वेक्षण केल्याची माहिती दिली; मात्र अन्य कोणीही रुग्ण आढळले नसल्याचे सांगितले.
यानंतर सरपंच नाईक, उपसरपंच खतीब यांनी बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे यांची भेट घेत शहरात बेकायदा राहत असलेल्या परप्रांतीय कामगारांना शहरातून बाहेर घालविण्याची मागणी केली. या कामगारांमुळे नाहक शहरातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. पोलिस निरीक्षक काळे यांनी याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
................
कोट
बांदा शहरात गोवरची लक्षणे असलेली मुले सापडल्याने याबाबत शहरवासीयांनी काळजी घ्यावी. हा संसर्गजन्य आजार असल्याने शक्यतो ताप, सर्दी किंवा अंगावर पुरळ आढळल्यास तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत. आरोग्य विभाग याबाबत सतर्क असून ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने देखील शहरात जनजागृती करण्यात येणार आहे.
- प्रियांका नाईक, सरपंच, बांदा