
-चिपळुणात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सुरू
३१ (पान ५ साठी)
-ratchl२०७.jpg ः
२३M०३९८८
चिपळूण ः आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत सहभागींना प्रशिक्षण देण्यात आले.
---
चिपळुणात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण सुरू
चिपळूण, ता. २० ः पावसाळ्यात २२ जुलै २०२१ सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवल्यास अथवा अन्य आपत्ती ओढावल्यास त्याला कसे तोंड द्यावे. याबाबत चिपळूण पालिका प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या आपत्तीविरोधात लढण्यासाठी मदत कार्यासाठी धावणाऱ्या व्यक्तींना शनिवारपासून दोन दिवस प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये २५ हौशी जलतरणपटू व ९० कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.
गतवर्षी २२ जुलैच्या महापुराने चिपळूण शहरात एकच हाहाकार उडाला होता. बचाव कार्य वेळेत न झाल्याने मोठी मनुष्य व वित्त हानी झाली. त्यानंतर येथील प्रशासनासह पालिका व्यवस्थापन नागरिकांच्या टीकेचे धनी झाले होते. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे, वेळीच मदत कार्य कसे पोहोचविता येईल व होणारे नुकसान कसे टाळता येईल. यासाठी चिपळूण पालिका प्रशासन आतापासूनच अलर्ट झाली आहे. प्रशासनाने पावसाळी पूरपरिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे येथील अस्तीत्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची नियुक्ती केली आहे.
वाशिष्ठी नदीतील गांधारेश्वर मंदिरालगतच्या डोहात हे प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. या शिबिरात आपत्कालीन बचाव कार्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे. शनिवारी पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून या निवड चाचणीला सुरुवात झाली. यावेळी शहरातील मुरादपुर, शंकरवाडी, पाग व बाजारपेठ परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे शहरातील २५ हून अधिक तरुण सहभागी झाले आहेत. याशिवाय पालिकेच्या बहुतांशी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी वाशिष्ठी नदीपात्राच्या मध्यवर्ती भागात जाऊन परत काठावर येणाऱ्या तरुणांची या प्रशिक्षणासाठी निवड केली. पुणे येथील अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भूषण देशपांडे यांनी संबंधित तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याधिकारी प्रसाद शिॅगटे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे, बाळकृष्ण पाटील, डॉ. माधवी साठे उपस्थित होत्या.
...