
रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत इन्सुलीत प्रबोधन
03989
इन्सुली ः तपासणी नाका येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आरटीओचे अधिकारी व कर्मचारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत इन्सुलीत प्रबोधन
आरोटीओचा पुढाकार; चालकांसह पादचाऱ्यांनाही धडे
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २० ः रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे बांदा इन्सुली येथील सीमा तपासणी नाका विभागाकडून सातवा ग्लोबल रोड सेफ्टी सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी आरटीओ विभागातर्फे चालकांचे प्रबोधन करण्यात आले.
१५ मेपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने सीमा तपासणी नाका इन्सुली येथे अवजड वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांच्या चालकांसाठी रस्ता सुरक्षा तसेच वाहतुकीचे नियम या संबंधी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमामध्ये वाहनांना परावर्तक व रस्ता सुरक्षा बोधचिन्ह यांची स्टिकर्स लावण्यात आली. तसेच ‘पादचाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे’ यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यात आले.
हा उपक्रम उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्गचे अधिकारी मोटार वाहन निरीक्षक सचिन पोलादे, विजयकुमार अल्लामवार, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विनायक सपकाळ, पराग आऊलकर, वरिष्ठ लिपिक गणेश कोळी यांनी आयोजित केला. या कार्यक्रमास राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी दीपक सातवळेकर व चालक चिंदरकर तसेच मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे प्रतिनिधी अनिल पावसकर, पीयुसी सेंटर चालक प्रसाद सावंत आदी उपस्थित होते.