
चिपळुणातील एकाची 78 हजारांची फसवणूक
२५ (पान ३ साठी)
चिपळुणातील एकाची
७८ हजारांची फसवणूक
चिपळूण, ता. २० ः क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केली तर मोठ्या प्रमाणात फायदा होतो, असे अमिषाद्वारे एका व्यक्तीची तब्बल ७८ हजाराची अज्ञाताने फसवणूक केली. याबाबत शिरगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १९) रोजी गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूक झालेली व्यक्ती अलोरे, संतकृपा कॉलनी, जुन्या पोलिस ठाणेनजीकची रहिवासी आहे. हा प्रकार ८ मे रोजी घडला. यातील फिर्यादी यांनी त्यांच्याकडील स्मार्टफोनवरील त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंटवरून नाताश सर्टिफाईड ट्रेडर यांच्याशी क्रिप्टो करन्सीबाबत चॅटिंग केले. त्यांनी नाताश सर्टिफाईड ट्रेडरमध्ये ३५ हजार रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांचे बँकेच्या खात्यातून मोबाईल गुगल पे द्वारे ३५ हजार रुपये वर्ग केले. त्यानंतर वेबसाइटवरून सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी भामट्याने वेगवेगळ्या मोबाईल नंबरवर पुन्हा ४३ हजार रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीनी ती रक्कम पाठवली. अशी एकूण ७८ हजार रुपयांची फसवणूक झाली. याबाबत संबंधित व्यक्तीने शिरगाव पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याबद्दलची फिर्याद दिली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.