विशाल परब यांचा रत्नागिरी येथे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशाल परब यांचा 
रत्नागिरी येथे सत्कार
विशाल परब यांचा रत्नागिरी येथे सत्कार

विशाल परब यांचा रत्नागिरी येथे सत्कार

sakal_logo
By

04002
रत्नागिरी ः उद्योजक विशाल परब यांचा सत्कार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

विशाल परब यांचा
रत्नागिरी येथे सत्कार
कुडाळ, ता. २० ः कोकणचे सुपुत्र आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून बोलण्याची संधी मिळाली, हे भाग्य समजतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उद्योग खाते यशस्वीरित्या चालवून सामंत यांनी कोकणी नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या हस्ते झालेला सत्कार जीवनात नेहमीच स्मरणात ठेवीन, असे प्रतिपादन विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील पेवे खरेकोंड (ता. गुहागर) येथील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार व उद्‍घाटन समारंभाच्या पूर्वसंध्येला व्यासपीठावर विशाल परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, माजी आमदार विनय नातू, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील सुरेश सबरद, अमित लोटणीकर, दत्ता नरवणकर यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उद्योजक परब यांचा सत्कार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला. यावेळी मंत्री सामंत यांनी आपल्या भाषणात परब यांचे कौतुक केले.