-शहरप्रमुख सकपाळ पालकमंत्र्यांसोबत मुंबईला

-शहरप्रमुख सकपाळ पालकमंत्र्यांसोबत मुंबईला

.३२ (पान ३ साठी)

ratchl२०८.jpg ः
२३M०४००१
चिपळूण ः हेलिक़ॉप्टरमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या समवेत माजी नगरसेवक उमेश सकपाळ.
----------

शहरप्रमुख सकपाळ पालकमंत्र्यांसोबत मुंबईला

चिपळुणात जोरदार चर्चा ; कार्यकर्ते संभ्रमात

चिपळूण, ता. २० ः ठाकरे गट शिवसेनेचे शहरप्रमुख, माजी नगरसेवक उमेश सकपाळ नेमके शिवसेनेच्या कुठल्या गटात आहेत याची चर्चा रंगलेली असतानाच पालकमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टमधून शनिवारी त्यांनी मुंबईकडे उड्डान घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. उमेश सकपाळ हे सामंत यांच्यासोबत नेमके गेले कुठे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पालकमंत्री सामंत शनिवारी चिपळूण शहराच्या दौऱ्यावर होते. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या सुशोभिकरणाच्या भूमिपूजनपसंगी त्यांनी उमेश सकपाळ आहेत कुठे, असा प्रश्न जाहीर भाषणात विचारला. माजी नगरसेवक सकपाळ नेमके कुठे आहेत, हेच कळत नाही. खासदार विनायक राऊत म्हणतात उमेश आमच्याबरोबर आहे तर पालकमंत्री सामंत म्हणतात, उमेश आमच्यासोबत आहेत. उमेश सकपाळ कुणाबरोबर आहेत हे कळत नाही. त्यासाठी टॉस करण्याची गरज आहे; पण आज सकपाळ माझ्या पाठीमागे बसले आहेत, याचे मला समाधान असल्याचे सामंत म्हणाले. शहरातील विकासकामांची भूमिपूजने झाल्यानंतर त्यांनी सकपाळ यांना सोबत घेतले व मुंबईला उड्डाण केले. या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे कार्याध्यक्ष केदार साठेही होते. सकपाळ हे सामंत यांच्या हेलिकॉप्टरमधून गेल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. सकपाळ सामंत यांच्यासोबत गेल्याची दिवसभर चर्चा सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com