कळसुली आरोग्य केंद्रात 
पाणी टंचाईची समस्या

कळसुली आरोग्य केंद्रात पाणी टंचाईची समस्या

कळसुली आरोग्य केंद्रात
पाणी टंचाईची समस्या
कणकवली,ता. २० ः कळसुली (ता.कणकवली) प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी टंचाईची समस्या आहे. त्यामुळे परिसरातील रूग्णांची गैरसोय होत आहे. जवळपास १६ महसुली गावांतील रुग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येत असतात. गेले आठवडाभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी इलेक्ट्रिक मोटार जळाली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. ऐन उन्हाळ्यात पर्यायी व्यवस्था नसल्याने रूग्णालयातील परिसरात वास्तव्याला असलेल्या कर्मचाऱ्याची गैरसोय झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com