पान दोन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान दोन
पान दोन

पान दोन

sakal_logo
By

निवळीतील जुगार अड्डयाव कारवाई

रत्नागिरी ः तालुक्यातील निवळी-मालपवाडी येथे एका दुकानाच्या आडोशाला मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. साहित्यासह ६३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल दत्ताराम रहाटे असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मालपवाडी जाणाऱ्या रस्त्यावर आदित्य कम्युनिकेशन या दुकानाच्या मागील बाजूस दुकान गाळ्याच्या आडोशाला निदर्शनास आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित मुंबई मटका नावाचा जुगार चालवत असताना निदर्शनास आला. त्याच्याकडून साहित्यासह ६३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.
------