
डेगवेत गतिरोधकांवर अखेर पांढरे पट्टे
04226
श्री देवी भवानी
सोनुर्लीत बुधवारी
पिंडिका प्रतिष्ठापना
सावंतवाडी ः सोनुर्ली-पाक्याचीवाडी येथील श्री देवी भवानी मंदिरात नूतन पिंडिका प्रतिष्ठापना सोहळा बुधवारी (ता. २४) आयोजित केला आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन हिराप बंधू आणि पाक्याचीवाडी ग्रामस्थांनी केले आहे. यावेळी सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सातला देवतांना गाऱ्हाणे सांगून कार्यक्रमाची सुरुवात, यजमान प्रायश्चित देहशुद्धी, गणेशपूजन, पुण्याहवाचन, स्थलप्रकार शुद्धी, जलाधिवास, पिंडिका स्नपन विधी, शय्याधिवास, मुख्य देवता स्थापन, अग्निस्थापन, ग्रहयज्ञ, हवन, दुपारी साडेबाराला पिंडिका प्रतिष्ठापना, बलिदान, पूर्णाहूती, अभिषेक, आवाहित देवता पूजन, आरती, प्रार्थना, आशीर्वाद, एकला नैवेद्य, ओटी भरणे, महाप्रसाद, रात्री दहाला वालावलकर दशावतार नाट्यमंडळ, ओरसगाव (नाथा नालंग) यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
--
‘किलबिल जल्लोष’
कनेडीत उत्साहात
कणकवली ः छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य माणसाला न्याय दिला. राज्यात पुन्हा एकदा शिवराज्य आणण्याचा संकल्प सर्वांनी केला पाहिजे. मुलांनी शिवरायांना आदर्श मानून न्यायाचे राज्य आणण्यासाठी योद्धा बनून काम करावे, असे आवाहन शिवसेना नेते तथा माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले. युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे कनेडी येथील समाधी पुरुष हॉल समोरील पटांगणावर ‘एक दिवस छोट्या दोस्तांसाठी’ अर्थात ‘किलबिल जल्लोष’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सावंत बोलत होते. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, संजना सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, माजी सभापती सुरेश सावंत, सांगवे सरपंच संजय सावंत, करंजे सरपंच सपना मेस्त्री, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे आदींसह नाटळ व हरकुळ जिल्हा परिषद मतदासंघातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.