सोनुर्लीत बुधवारी पिंडिका प्रतिष्ठापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनुर्लीत बुधवारी पिंडिका प्रतिष्ठापना
सोनुर्लीत बुधवारी पिंडिका प्रतिष्ठापना

सोनुर्लीत बुधवारी पिंडिका प्रतिष्ठापना

sakal_logo
By

04226
श्री देवी भवानी

सोनुर्लीत बुधवारी पिंडिका प्रतिष्ठापना
सावंतवाडी ः सोनुर्ली-पाक्याचीवाडी येथील श्री देवी भवानी मंदिरात नूतन पिंडिका प्रतिष्ठापना सोहळा बुधवारी (ता. २४) आयोजित केला आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन हिराप बंधू आणि पाक्याचीवाडी ग्रामस्थांनी केले आहे. यावेळी सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सातला देवतांना गाऱ्हाणे सांगून कार्यक्रमाची सुरुवात, यजमान प्रायश्चित देहशुद्धी, गणेशपूजन, पुण्याहवाचन, स्थलप्रकार शुद्धी, जलाधिवास, पिंडिका स्नपन विधी, शय्याधिवास, मुख्य देवता स्थापन, अग्निस्थापन, ग्रहयज्ञ, हवन, दुपारी साडेबाराला पिंडिका प्रतिष्ठापना, बलिदान, पूर्णाहूती, अभिषेक, आवाहित देवता पूजन, आरती, प्रार्थना, आशीर्वाद, एकला नैवेद्य, ओटी भरणे, महाप्रसाद, रात्री दहाला वालावलकर दशावतार नाट्यमंडळ, ओरसगाव (नाथा नालंग) यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
..............
कुडाळात कळसूत्री बाहुल्यांचा खेळ
कुडाळ ः भारत देशाचा खरा इतिहास कोणता, त्यामध्ये क्रांतिकारकांचे योगदान किती, वि.दा.सावरकर यांचे योगदान काय, हे प्रत्येकाला समजणे गरजेचे आहे. या अनुषंगाने ‘मी सावरकर’ हा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ २७ व २८ मे रोजी सायंकाळी सातला मराठा समाज हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी शिवदास मसगे, रमाकांत नाईक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.