वेंगुर्लेतील शिबिरात २५ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेतील शिबिरात
२५ जणांचे रक्तदान
वेंगुर्लेतील शिबिरात २५ जणांचे रक्तदान

वेंगुर्लेतील शिबिरात २५ जणांचे रक्तदान

sakal_logo
By

04228
वेंगुर्ले ः येथे रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन करताना सुरेंद्र खामकर.

वेंगुर्लेतील शिबिरात
२५ जणांचे रक्तदान

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २२ ः जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मित्रमंडळ, अजित राऊळ मित्रमंडळ व लोकमान्य मल्टिपर्प कॉपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरावेळी २५ दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र खामकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. यावेळी मंडळाचे संस्थापक सदस्य अजित राऊळ, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, सिधुरक्त मित्रचे महेश राऊळ, बँक ऑफ इंडियाचे माजी कर्मचारी सतिश डुबळे, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, डॉ. राहुल पाटील, माजी नगरसेवक यशवंत किनळेकर, अॅड. नविना राऊळ, पेडणेकर, लोकमान्य मल्टिपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी शाखा वेंगुर्ल्याचे शाखाधिकारी पुरुषोत्तम राऊळ, उपशाखाधिकारी चक्रपाणी गवंड, प्रकाश मालवणकर उपस्थित होते. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जबरदस्त मित्रमंडळाचे सदस्य निलेश परब, बापू वेंगुर्लेकर, ज्ञानेश्वर रेडकर, कौशल मुळीक, विवेक राऊळ, गजानन गोलतकर, सागर शिरसाट, बाबा वेंगुर्लेकर, देवेंद्र गावडे, अशोक कोलगांवकर, हितेश राऊळ, वैभव फटजी, निखिल नाईक आदींनी परिश्रम घेतले.