
पोसरे नं. 1 आणि 2 यांना आदर्श शाळा पुरस्कार
rat२२p४-.jpg -
M04236
रत्नागिरी - पुरस्कार स्वीकारताना सरपंच महेश आदावडे, मुख्याध्यापक व पदाधिकारी
पोसरे नं. १ आणि २ यांना
आदर्श शाळा पुरस्कार
चिपळूण, ता. २२ः उत्कृष्ट शैक्षणिक प्रगती केल्याबद्दल ग्रामीण भागातील आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार म्हणुन चिपळूण तालुक्यातून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोसरे नं. १ आणि प्राथमिक शाळा पोसरे नं. २ या एकाच गावातील दोन शाळांना आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार गौरविण्यात आले.
स्व. शामरावजी पेजे सांस्कृतिक भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्या स्वाक्षरीने प्रशस्तीपत्रक सन्मान पूर्वक देण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार सन्मान वितरण सोहळा मुख्यकार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते, उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या दोन्ही शाळांनी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. त्यासाठी लोकसभागाची जोडी दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाची आदर्श शाळा पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली. पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते वितरण केलेला आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार पोसरे गावाचे सरपंच महेश आदावडे, उपसरपंच प्रणाली भरत तामुंडकर, पोसरे नं. १ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शमा म्हैसकर, उपाध्यक्ष राहुल कदम, मुख्याध्यापक संतोष रेपाळ, पोसरे नं. २ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप उदेग, अविनाश आदावडे, मुख्याध्यापिका सुप्रिया सावर्डेकर, ग्रामस्थ पालक आणि शिक्षक यांनी स्विकारला.