स्टीरियोटॅक्टिक रेडिओ-सर्जरीने कर्करोगावर प्रभावी उपचार

स्टीरियोटॅक्टिक रेडिओ-सर्जरीने कर्करोगावर प्रभावी उपचार

१७ (टूडे ३ साठी)


- rat२२p५.jpg-
२३M०४२३७
डॉ. अभिषेक पुरकायस्थ

स्टीरियोटॅक्टिक रेडिओ-सर्जरीने
कर्करोगावर प्रभावी उपचार

डॉ. अभिषेक पुरकायस्थ ः डोकेदुखी, उलट्यापासूनही आराम

चिपळूण, ता. २२ ः कार्ला (रत्नागिरी) येथील एका ५६ वर्षीय महिलेला चौथ्या वेंट्रिकलमध्ये मेंदूच्या मेटास्टॅसिससह स्तनाचा मेटास्टॅटिक कार्सिनोमाचे निदान झाले. रुग्णाने ऑन्को-लाईफ केअर कॅन्सर सेंटरमध्ये भेट दिली. तिथे डॉ. अभिषेक पुरकायस्थ यांनी रुग्णावर उपचार केले. ज्याला रुग्णाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या उपचारात रुग्णाला डोकेदुखी, उलट्या या साऱ्यापासून चांगलाच आराम मिळाला आणि रुग्ण आधाराशिवाय चालू लागली.
उपचारानंतर डॉ. अभिषेक पुरकायस्थ म्हणाले, कॅन्सर एका शरीरात एका अवयवामधून सुरू होतो. कॅन्सर सेल्सची जशी वाढ होण्यास सुरूवात होते, तसा तो इतर अवयवांमध्येही पसरत जातो. यालाच मेटास्टॅसिस म्हणतात. कर्करोग जेव्हा वेगवेगळ्या ऊतींमध्ये आणि शरीराच्या अवयवांमध्ये पसरतो त्याला मेटास्टॅटिक कार्सिनोमा म्हणतात. कार्ला येथील या रुग्णाने सुरुवातील इतर कर्करोग केंद्रात केमोथेरपी आणि इतर उपचार घेतले. मात्र, तिला सतत चक्कर येऊ लागली. रुग्णाने १० महिन्यांनंतर ऑन्को-लाईफ केअर कॅन्सर सेंटरमध्ये भेट दिली. रुग्णाला डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि चालताना तोल जाणे यासारख्या तक्रारी जाणवत होत्या. रुग्णाने ऑन्को-लाईफ केअर कॅन्सर सेंटर येथील डॉ. अभिषेक पुरकायस्थ (रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट) यांची भेट घेतली. रुग्णाला त्याच्या लक्षणांनुसार उपचार देण्यात आले आणि मेंदुचा एमआरआय काढण्यात आलेला. आला ज्यामध्ये चौथ्या वेंट्रिकलमध्ये मेंदूचे घाव दिसून आले. यावरून असे दिसून आले की मेंदूच्या जखमांनी १० महिन्यांपूर्वी केलेल्या रेडिएशन उपचारांना योग्य प्रतिसाद दिला नाही. डॉ. अभिषेक पुरकायस्थ यांच्या मूल्यांकनानंतर रुग्णाला केवळ स्टिरियोटॅक्टिक रेडिओ-सर्जरी (SRS) वापरून री-रेडिएशनचा फायदा होऊ शकतो असे निदान झाले. त्यांनी रुग्ण आणि तिच्या नातेवाइकांचे मेंदूला होणारे री-रेडिएशनचे फायदे आणि दुष्परिणामांविषयी समुपदेशन केले. सध्या रुग्ण फॉलो-अप घेत असून ४ महिन्यांनंतर मेंदूचा पुन्हा एमआरआय केल्यानंतर त्या भागातील जखमांचे बऱ्या झाल्याचे दिसून आले. या प्रकरणात असे दिसून आले की एसआरएस हा अत्यंत लहान ब्रेन ट्यूमरसाठी आणि मेंदूमध्ये रीरेडिएशन दरम्यानचा उत्तम पर्याय ठरतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com