मुळगे-आडवळवाडी किनाऱ्याची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळगे-आडवळवाडी
किनाऱ्याची स्वच्छता
मुळगे-आडवळवाडी किनाऱ्याची स्वच्छता

मुळगे-आडवळवाडी किनाऱ्याची स्वच्छता

sakal_logo
By

04268
मुणगे ः स्वच्छता अभियानात सहभागी विद्यार्थी व ग्रामस्थ.

मुळगे-आडवळवाडी
किनाऱ्याची स्वच्छता
मुणगे ः पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वनविभाग सावंतवाडी, वनपरिमंडळ देवगड आणि त्रिपुरा फाउंडेशनचे विद्यार्थी व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने येथील आडवळवाडी समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छ गाव समृद्ध गाव आणि पर्यावरणपूरक मुणगे गावाला निसर्गरम्य समुद्र किनारा लाभला आहे. या किनाऱ्याची स्वच्छता सावंतवाडी वनविभाग, वनपरिमंडळ देवगड, त्रिपुरा फाउंडेशनचे विद्यार्थी व आडवळवाडी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी यारिक फकीर, वनरक्षक नीलेश साठे, त्रिपुरा फाउंडेशनच्या शिक्षिका सुविधा बोरकर, आडवळवाडी येथील ग्रामस्थ अजित रासम, अरुण रासम, नंदकिशोर महाजन, नीलेश महाजन, किरण रासम, गौरी रासम, श्री. मांजरेकर आदी उपस्थित होते. समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करून जमा झालेला कचरा पिशवीत भरून ठेवण्यात आला.
................
04259
मालवण ः मेढा येथील मुरलीधर मंदिरात चंदन उटी पूजा पार पडली.

मोगरा महोत्सव मालवणात साजरा
मालवण : शहरातील मेढा येथील मुरलीधर मंदिरात श्रीकृष्णाची चंदन उटी पूजा व मोगरा महोत्सव सोहळा नुकताच झाला. उन्हाळा ऋतूत भगवंतांना विश्रांती मिळावी, या भावनेने ही चंदन उटी पूजा करण्यात आली. यावेळी श्रीकृष्ण मूर्तीच्या सभोवताली मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. दर्शन वझे व उदय वझे यांच्याकडून ही पूजा करण्यात आली. यावेळी भाविकांनी उपस्थित राहून श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. यानिमित्त मंदिरात भजनसम्राट भालचंद्र केळूसकर यांची भजन सेवा व इतर कलाकारांची गायन सेवा पार पडली.