आकाशवाणीसाठी कार्तिकीची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकाशवाणीसाठी 
कार्तिकीची निवड
आकाशवाणीसाठी कार्तिकीची निवड

आकाशवाणीसाठी कार्तिकीची निवड

sakal_logo
By

आकाशवाणीसाठी कार्तिकीची निवड
सावंतवाडी ः मुंबई येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या ‘शाळेबाहेरची शाळा’ या उपक्रमांतर्गत नागपूर आकाशवाणीवरील फोन इन कार्यक्रमासाठी आयएसओ मानांकित माडखोल धवडकी शाळा नं. २ ची विद्यार्थिनी कार्तिकी वर्दम हिची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाली आहे. एपिसोड नं. ४६२ या कार्यक्रमाचे प्रसारण ३० मे रोजी सकाळी अकराला नागपूर आकाशवाणीवरून होणार आहे. कार्तिकी ही सहावीची विद्यार्थिनी असून ‘भारतीय संसद कायदे कसे तयार करते’, या विषयावर ती बोलणार आहे. यासाठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक अरविंद सरनोबत यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे आणि शाळेतील शिक्षकांनी कार्तिकीचे अभिनंदन केले.
---
गतिरोधकांवर अखेर पांढरे पट्टे
सावंतवाडी ः डेगवे येथे गतिरोधकांच्या ठिकाणी अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढरे पट्टे मारल्याने समाधान व्यक्त होत आहे. रविवारी (ता. २१) दुपारी हे पांढरे पट्टे मारण्यात आले. डेगवे येथे चार ठिकाणी गतिरोधक असून ते वाहन चालकांच्या लक्षात येत नव्हते. त्यामुळे वारंवार अपघात होत. त्यात अनेक वाहनचालक जखमी झाले होते. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक दर्शविणारे सूचना फलक किंवा पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख विजय देसाई यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन डेगवे येथे काल गतिरोधकांच्या ठिकाणी पांढरे पट्टे मारण्यात आले. त्यामुळे आता अपघात कमी होणार आहेत, असे देसाई यांनी स्पष्ट केले. लवकरच या ठिकाणी सूचनाफलक लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
--
मालवणात गुरुवारी ज्येष्ठांची सभा
मालवण ः ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, मालवणची मासिक सभा गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पाचला येथील हॉटेल लिलांजली हॉल, भरड येथे आयोजित केली आहे. या सभेला प्रजापती ब्रह्माचारी यांचे अनुयायी मार्गदर्शन करणार आहेत. उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर यांनी केले.