
खेडमध्ये हापुसची आवक वाढली, दर चढेच
१२ (पान २ साठीमेन)
-rat२२p१५.jpg-
२३M०४२९७
खेड ः शहरातील तीनबत्ती नाका येथे आंबे विक्रीसाठी दाखल झालेले आंबे व्यापारी
-------------
खेडमध्ये हापुसची आवक वाढली
शेकडा दोन ते तीन हजार रुपये ः तिनबत्ती नाक्यात आंब्याची बाजारपेठ
खेड, ता. २२ ः येथील बाजारपेठेत हापुस खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली आहे. काही दिवसांपूर्वी आवाक्याबाहेर गेलेल्या हापुसच्या दरात घसरण झाली असून सद्यस्थितीत शेकडा २००० ते ३००० रुपये दराने हापुसची विक्री होत आहे. सुरवातीला बाजारात आंबा उपलब्ध नसल्यामुळे सहाशे ते आठशे रुपये डझन असा हापूस आंब्याचा दर सुरू होता. त्यानंतर तुरळक पावसाच्या सरींनी बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळविले होते. मात्र त्यानंतर सद्यस्थितीत हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. सुरवातीला चार ते साडेचार हजार रुपये शेकडा असलेला हापूस आंबा आता दोन ते तीन हजार रुपये शेकडा दराने बाजारात उपलब्ध झाला आहे.
खेड तालुक्याच्या खाडीपट्ट्यातील हापूस आंबा मोठ्या प्रमाणात खेड च्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होतो. दरवर्षी मार्च महिन्याच्या पंधरवड्यात हापूस आंबा खेड बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होतो. परंतु यावर्षी खराब हवामानामुळे हापूस आंबा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी दाखल झाला आहे. सुरवातील दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे असल्यामुळे आंबा खरेदीकडे खवय्यांनी पाठच फिरवली होती. परंतु आता मात्र मुंबई - पुणे तसेच चाकरमान्यांची आंबा खरेदी करताना गर्दी दिसून येत आहे. खेड शहरातील तिनबत्ती नाका येथे दरवर्षी हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. आता शेकड्याला दोन ते तीन हजार रुपयांचा दर असून हापूस आंब्याला मागणी वाढली आहे, अशी माहिती आंबा व्यापारी स्वरुप जाधव यांनी दिली. तीनबत्ती नाका येथे स्थानिक बागायतदारांसह दापोली तालुक्यातील आंबा विक्रेते हापुसच्या विक्रीसाठी येथे दाखल झाले आहेत.
---
चौकट
हापूसचे दर
शेकडा- दोन ते तीन हजार रुपये
डझन- ५०० ते ८०० रुपये डझन