
''एज्युकेशन महायात्रा'' साठी आजच करा नोंदणी
‘एज्युकेशन महायात्रा’ साठी आजच करा नोंदणी
१४ ते १६ जून दरम्यान आयोजनः करिअर मार्गदर्शन एकाच छताखाली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ः इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा संपली की वेध लागतात ते महाविद्यालयीन शिक्षणाचे आणि करिअरची नेमकी दिशा ठरविण्याचे. अनेकदा विद्यार्थी-पालकांना महाविद्यालय, करिअर निवडताना कसरत करावी लागते किंवा योग्य मार्गदर्शना अभावी त्यांचा अनेकदा गोंधळ उडतो. त्यावेळी गरज असते ती ठरविलेल्या करिअरबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्याची, योग्य दिशा देण्याची. आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर सकाळ माध्यम समूहातर्फे संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘सकाळ एज्युकेशन महायात्रा २०२३’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यासाठी आता शैक्षणिक संस्थांच्या नोंदणीला सुरवात झाली असून १४ ते १६ जूनदरम्यान येथील रत्नागिरीतील माळनाका येथील मराठा भवन मंगल कार्यालय येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
चौकट
एकाच छताखाली सर्व माहिती
दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध असणाऱ्या पर्यायांची माहिती येथे मिळणार आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, पॅरामेडिकल, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांच्या माहितीचे प्रदर्शन यात असणार आहे. त्याचबरोबर जेईई, नीट, सीईटी यांसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही मार्गदर्शन करणाऱ्या शैक्षणिक संस्था यात सहभागी होऊ शकतात.
चौकट
स्टॉलचे बुकिंग कोण करू शकते
पुण्यासह राज्यातील नामांकित शिक्षण संस्थांना या प्रदर्शनात सहभागी होता येईल. तसेच प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयापासून ते कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ''केजी टू पीजी'' अभ्यासक्रमांसाठी येथे स्टॉलचे बुकिंग करता येणार आहे.
चौकट
येथे करा ''स्टॉल्स''चे बुकिंग
या शैक्षणिक प्रदर्शनात तुम्हाला तुमचा स्टॉल असावा, असे वाटतं का? तर मग लवकरात लवकर संपर्क साधा आणि शिक्षण आणि करिअरबाबत मार्गदर्शन, माहिती विद्यार्थी-पालकांपर्यंत पोचविण्यासाठी तयार व्हा.
चौकट
संपर्क : दत्तप्रसन्न कुलकर्णी- रत्नागिरी (९९२२४१६०६३), मनोज पवार-चिपळूण (९८५००६४१४८), भास्कर रासम -कणकवली (९०११०००६९४), हेमंत खानोलकर-सावंतवाडी (९८८१७१३९३८)