वैश्य पतसंस्था निवडणूक पुर्वतयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैश्य पतसंस्था निवडणूक पुर्वतयारी
वैश्य पतसंस्था निवडणूक पुर्वतयारी

वैश्य पतसंस्था निवडणूक पुर्वतयारी

sakal_logo
By

वैश्य पतसंस्था निवडणूक पूर्वतयारी

पारुप मतदार यादी जाहीर; ३१ मेपर्यंत आक्षेपास मुदत

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २२ ः जिल्ह्यातील प्रतिष्ठित व सभासद संख्येने जास्त असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाने सुरू केली आहे. आज निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली. यासाठी ३१ मेपर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट ही पतसंस्था जिल्ह्यातील एक मोठी सहकारी पतसंस्था आहे. या पतसंस्थेचा डोलारा मोठा असून सभासद संख्याही जास्त आहे. पूर्ण जिल्ह्यात या संस्थेच्या शाखा आहेत. त्यामुळे या पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने याची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध केली. या यादीवर आजपासून ३१ मे पर्यंत लेखी हरकत नोंदविण्यासाठी मुदत आहे. १ जूनला दाखल हरकतींवर निर्णय दिला जाणार आहे. तर १४ जूनला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाने आज जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार मुख्य कार्यालय ५७६, कणकवली ६७५, कुडाळ ५०५, वेंगुर्ले २६, मालवण १८७, देवगड २३३, वैभववाडी १९६, सावंतवाडी ६७६, माणगाव ३६६ आणि दोडामार्ग १६६ असे मतदार निश्चित झाले आहेत. या संस्थेसाठी एकूण १३ संचालक निवडून द्यायचे आहेत. यात सर्वसाधारण आठ आणि आरक्षित पाच संचालकांचा समावेश आहे.
-----------
चौकट
या संस्थांच्याही प्रारूप याद्या
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था जामसंडे, भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था आणि सिंधुसागर इंडस्ट्रियल को. ऑफ सोसायटी लिमिटेड हरकुळ बुद्रुक या तीन संस्थांच्या प्रारूप मतदार याद्याही आज प्रसिद्ध करण्यात आल्या. यासाठीही ३१ मेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार असून १ जूनला त्यावर निर्णय दिला जाणार आहे. १४ जूनला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.