जिल्ह्यात आजपासून ''स्त्री शक्ती समाधान'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात आजपासून 
''स्त्री शक्ती समाधान''
जिल्ह्यात आजपासून ''स्त्री शक्ती समाधान''

जिल्ह्यात आजपासून ''स्त्री शक्ती समाधान''

sakal_logo
By

जिल्ह्यात आजपासून
‘स्त्री शक्ती समाधान’
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २२ : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे व त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून राबविण्यात येणाऱ्या लोकशाही दिनाच्या धर्तीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान’ शिबिराचे आयोजन महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात उद्यापासून (ता. २३) २६ मेपर्यंत पुढीलप्रमाणे तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन केले आहे. उद्या (ता. २३) सकाळी १० वाजता कणकवली (मातोश्री मंगल कार्यालय) कुडाळ ः सकाळी १० वाजता (सिध्दीविनायक हॉल रेल्वे स्टेशन रोड), वेंगुर्ले ः सकाळी ९ वाजता (तहसीलदार कार्यालय), २४ ला वैभववाडी ः सकाळी १० वाजता (तहसीलदार कार्यालय), २५ ला दोडामार्ग ः सकाळी १० वाजता (महालक्ष्मी हॉल, पंचायत समितीनजीक, कसई), देवगड ः सकाळी १० वाजता (इंद्रप्रस्थ हॉल), २६ ला मालवण ः सकाळी ८.३० वाजता (स्वामी समर्थ मंगल कार्यालय, कोळंब), सावंतवाडी ः सकाळी ९ वाजता (आरपीडी हायस्कूल, सावंतवाडी). अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यांच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी अथवा तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.