चिपळुणातून अडीच हजार लोक जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणातून अडीच हजार लोक जाणार
चिपळुणातून अडीच हजार लोक जाणार

चिपळुणातून अडीच हजार लोक जाणार

sakal_logo
By

चिपळुणातून ६३ एसटीची व्यवस्था
चिपळूण, ता. २२ः रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरूवारी २५ रोजी शासन आपल्या दारी या शासकीय योजनांची यात्रा भरणार आहे. या यात्रेसाठी चिपळुणातून तब्बल अडीच हजार लोक जाणार आहे. त्यासाठीची लगीनघाई गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. लाभार्थ्यांच्या प्रवासासाठी चिपळूण तालुक्यातून ६३ एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
शहरासह ग्रामीण भागातील लोकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी. त्याचा प्रचार व जनजागृती व्हावी. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात आहे. त्याअंतर्गत रत्नागिरी येथील स्व. प्रमोद महाजन क्रीडांगणावर यात्रेचे आयोजन केले आहे.
चिपळूण तालुक्यातून एकूण २२५० लोकांची व्यवस्था केली आहे. त्यानुसार तहसील कार्याद्वारे ४५० लाभार्थी, तालुका कृषी अधिकारी २००, चिपळूण नगरपालिका २५०, तालुका आरोग्य अधिकारी ६०, गटविकास अधिकारी चिपळूण १२९० यांचेकडून लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार रत्नागिरीला जाण्यासाठी ४९ एसटी, १४ मिनी बसेस अशा एकूण ६३ बसेस आरक्षित केल्या आहेत. ज्या नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला आहेत, त्यांनाच या यात्रेसाठी निमंत्रित केले आहे. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेचे ४५ लाभार्थी, बचत गटाच्या १ हजार महिला, रोजगार हमीचे ९५, आरोग्य चे ६६, कृषी १३, स्वच्छ भारत मिशनचे १२०, हर घर जल चे ३०, माझी कन्या चे ७९, पशुसंवर्धचे ३८ लाभार्थी निश्चित करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना यात्रेच्या ठिकाणी प्रमाणपत्रांचे वाटपही केले जाणार आहे.