खेडमधील व्यापारी संकुलाच्या जिन्यातच कचऱ्याचे ढीग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडमधील व्यापारी संकुलाच्या जिन्यातच कचऱ्याचे ढीग
खेडमधील व्यापारी संकुलाच्या जिन्यातच कचऱ्याचे ढीग

खेडमधील व्यापारी संकुलाच्या जिन्यातच कचऱ्याचे ढीग

sakal_logo
By

४३१५
पान 5 साठी)


खेडमध्ये व्यापारी संकुलाच्या
जिन्यातच कचऱ्याचे ढीग

खेड, ता. २२ : येथील शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले खेड नगरपालिकेच्या स्व. भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलाच्या जिन्यामध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहे. नगरपालिका प्रशासनाच्या सफाई कामगारांकडून होत असलेल्या कामचुकारपणा मुळेच याठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
शहराच्या मध्यवर्ती भागात सर्व शासकीय कार्यालयाशेजारी खेड पालिकेचे स्व. भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुल आहे. या संकुलात अनेक नामांकित वकील, इंजिनियर, पतसंस्था यांची कार्यालये आहेत. तर अत्यंत महत्वाचे असणारे दुय्यम निबंधक कार्यालय या इमारतीत असून येथे अनेक नागरिक महत्वाचे दस्तावेज बनविण्यासाठी येत असतात. या कार्यकायच्या समोर असणाऱ्या जिन्यातच कचऱ्याचे ढीग साचून घाणीचे साम्राज्य याठिकाणी निर्माण झाले आहे. खेड पालिकेच्या सफाई कामगारांना वारंवार तक्रार देऊनही येथील कचरा उचलला जात नसल्याने व्यापारी, येथे येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी नगरपालिकेने तत्काळ कारवाई करून भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलाची इमारत स्वच्छ करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.