संक्षिप्त

संक्षिप्त

पान २ साठी, संक्षिप्त)


‘दिलखुलास’ कार्यक्रमातील मुलाखत
२३, २४, २५ ला होणार प्रसारित
रत्नागिरी : राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या कक्षाच्या कार्यपद्धतीची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली. गरजू रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू केला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठीची अर्ज प्रक्रिया, तसेच कोणत्या आजारासाठी कशा स्वरूपात आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते, याबाबत या कक्षाचे विशेष कार्यकरी अधिकारी श्री. चिवटे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत २३ मे, २४ मे आणि २५ मे रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ''न्यूज ऑन एआयआर'' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक राजेंद्र हुंजे यांनी घेतली आहे.

रत्नागिरीतील नाट्यगृहाला नावच नाही
रत्नागिरी : रत्नागिरीतील नाट्यगृहाला स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे नाव देण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह असे मोठ्या अक्षरात नाव हवे होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह असे नाव दिसत नाही. सावरकर नाट्यगृहामध्ये वातानुकूलीत यंत्रणा, साऊंड सिस्टीमच्या समस्या तर आहेतच. त्याबरोबर मोठ्या प्रमाणात अस्वच्छताही आहे.

ग्रामीण मार्गावरीलही काही फेऱ्या रद्द
रत्नागिरी : उन्हाळी सुट्या सुरू आहेत. त्यामुळे पर्यटक, मुंबईकरांचे आगमन मोठ्या प्रमाणावर होत आहे. ग्रामीण, लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रवाशांची गर्दी होत आहे. प्रवासी क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी घेत एसटी पळत आहे. त्यातच रविवारी रत्नागिरी आगाराचे वेळापत्रक कोलमडल्याने ऐन उकाड्यात प्रवाशांचे हाल झाले. ही परिस्थिती गेला महिनाभर असून, त्यावर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नाही. पहाटे ४:४५ वाजता सुटणारी रत्नागिरी - लातूर बस कधीच वेळेवर नसते. या मार्गावर नवीन बस शक्यतो लावली जाते. पुणे येथून बस आल्यानंतर चालकासह उपलब्ध केली जाते. त्यामुळे बहुधा ही बस साडेपाचपर्यंत सुटते. त्याचवेळी जत गाडी असते. परिणामी प्रवासी विभागले जातात. पहाटे ४:४५ ची बस वेळेत सुटली तर प्रवाशांना याचा फायदा होईल, शिवाय एसटीच्या उत्पन्नात भर पडेल; परंतु ही बस अनियमित असल्याने खासगी बस याच दरम्यान सुटत असल्याने वेळेला महत्त्व देत प्रवासी खासगी बसने निघून जातात. नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत.


रत्नागिरीत २९ ला पेन्शन आपल्या दारी
रत्नागिरी ः पेन्शनधारक कामगाराच्या हितासाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या पुढाकाराने सोमवारी (ता. २९) रत्नागिरी जिल्ह्यात पेन्शन आपल्या दारी हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यामध्ये अधिकारी पेन्शनधारकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. त्याशिवाय पेन्शनधारकांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, नव्याने झालेले बदल याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १० ते ५ या वेळात गद्रे मरीन एक्सपोर्ट, एमआयडीसी, मिरजोळे, रत्नागिरी येथे होणार आहे. भविष्य निर्वाह अधिकारी दर महिन्याचे २७ तारखेला रत्नागिरी जिल्ह्यात येत असतात. जानेवारी मध्ये ते फिनोलेक्स कॉलनी रत्नागिरी, फेब्रुवारीमध्ये घरडा केमिकल्स खेडमध्ये, मार्च महिन्यात लाईफ केअर हॉस्पीटल चिपळूणमध्ये, एप्रिल महिन्यात पेन्शन ऑफीस दापोलीमध्ये येऊन गेले होते. तरी निवृती वेत्तन धारक आणि त्यांच्या संघटनानी रत्नागिरी जिल्ह्यातील या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय भविष्य निधी आयुक्ताने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com