
साडेदहा कोटी निधीतून यात्रास्थळांचा विकास
३० (पान ३ साठी)
-rat२२p२३.jpg-
२३M०४३२२
चिपळूण ः दादर येथील रामवरदायिनीचे सुंदर मंदिर.
---
साडेदहा कोटीतून यात्रास्थळांचा विकास
पाच वर्षांतील स्थिती ; गावागावातील मंदिरांना झळाळी
रत्नागिरी, ता. २२ ः कोकणातील गावागावामध्ये असलेल्या मंदिरांचे पर्यटनदृष्ट्या महत्व आहे. याचा विचार करून त्या मंदिरांना ग्रामीण यात्रास्थळाचा दर्जा शासनाकडून देण्यात आला आहे. त्यानुसार दरवर्षी शासन यात्रास्थळांच्या विकासासाठी निधीची तरतूद करते. या योजनेतून रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या पाच वर्षांमध्ये साडेदहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात २ कोटी २५ लाख रुपये मंजूर झाले असून त्यातील कामे अंतिम टप्प्यात आहेत.
जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडून ग्रामीण यात्रास्थळांची निश्चिती केली जाते. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक छोटी-मोठी देवतांची मंदिरे वसलेली आहे. प्राचीन काळातील मंदिराना इतिहास आहे. ही मंदिरे सुशोभित केल्यास पर्यटनालाही चालना मिळू शकतो. यामध्ये कशेळीतील सुर्यमंदिर, चिपळूणातील रामवरदायिनी मंदिर, धामणसेतील रत्नेश्वर, सुकाई मंदिर, गुहागरमधील सोमेश्वर मंदिरांसाठी अनेक मंदिरे आहेत. त्यांचे सुशोभीकरणे करणे, परिसरात संरक्षण भिंत बांधणे किंवा पेव्हर ब्लॉक टाकणे, रस्ता तयार करणे, संरक्षक भिंती बांधणे, पाखाडी बांधणे, सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे, सभा मंडप बांधणे यासारख्या कामांसाठी शासनाकडून निधी दिला जातो. याचे प्रस्ताव पंचायत समितींमार्फत जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडे दिले जातात. त्यांच्याकडून शासनाला सादर करता. त्यानंतर मंजुरी मिळते. गेल्या पाच वर्षांमध्ये साडेदहा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. सर्वाधिक निधी २०२१-२१ या आर्थिक वर्षात ४ कोटी ४० लाख रुपये निधी आला. २०२२-२३ या वर्षात सव्वा दोन कोटी रुपये निधी मंजूर होता. यामधून १९ कामे मंजूर होती. ती कामे सुरू आहेत. या कामांमुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
---
*वर्ष*कामे*मंजूर निधी
*२०१८-१९*१०*८० लाख
*२०१९-२०*२*३५ लाख
*२०२०-२१*३९*४ कोटी ४० लाख
*२०२१-२२*२२*२ कोटी ६२ लाख
*२०२२-२३*१९*२ कोटी २५ लाख