आश्‍वासनांमुळे मनसेचे ठिय्या आंदोलन स्थगित

आश्‍वासनांमुळे मनसेचे ठिय्या आंदोलन स्थगित

४३ (पान ३ साठी)


- rat२२p२४.jpg-
२३M०४३२३
संगमेश्‍वर ः कडवई येथील रेल्वेस्थानकावर एकवटलेले मनसेसैनिक.
---------
आश्‍वासनांमुळे मनसेचे आंदोलन स्थगित

कडवई रेल्वे स्थानकातील समस्या ; रेल्वे प्रशासनाला निवेदन

संगमेश्वर, ता. २२ ः तालुक्यातील कडवई येथील रेल्वे स्थानकातील समस्यांच्या विरोधात मनसेने सोमवारी (ता. २२) केलेले ठिय्या आंदोलन कोकण रेल्वेकडून मिळालेल्या सकारात्मक आश्‍वासनामुळे स्थगित करण्यात आले.
कडवई स्थानक सुरू होऊन दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला तरीही अनेक त्रुटी आहेत. सध्या फक्त एकच पॅसेंजर गाडी इथे थांबत असून दिवा-सावंतवाडी गाडी थांबत नसल्याने या प्रवाशांची अडचण होते. या स्थानकात प्रवाशांना उतरण्यासाठी प्लॅटफॉर्मच नसल्याने गाडी थांबूनही प्रवाशांना त्याचा उपयोग होत नाही. प्रवाशांना उभे रहाण्यासाठी प्रवाशी निवारा शेडची पुरेशी व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. कडवई स्थानकावर डाऊनच्या दिशेने मोठा फलक नसल्याने प्रवाशांची गफलत होते. याकडे लक्ष वेधत मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रत्नागिरी यांना लक्ष निवेदन सादर केले. यामध्ये प्लॅटफॉर्मच्या बाजूला धामनाक वाडी लगत संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी केली. कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक मान्सून उपाययोजनेच्या कामासाठी रोहा येथे गेले असल्याने त्यांच्या वतीने जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन झालेल्या कार्यवाही बद्दल माहिती दिली. यातील क्षेत्रीयस्तरावरील ज्या मागण्या होत्या, त्यांची पूर्तता करण्यास सुरवात झाली असून ज्या मागण्या वरिष्ठ पातळीवरून पूर्ण होणार आहेत त्याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. यासाठी आठच दिवसात क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक यांच्या सोबत जितेंद्र चव्हाण आणि प्रमुख ग्रामस्थाची बैठक लावून चर्चा करण्यात येईल असेही आश्वासन दिले.
----
कोट
सकारात्मक चर्चेनंतर लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. या मागण्यांवर दोन महिन्यात सकारात्मक कार्यवाही न झाल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल.
- जितेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष मनसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com