स्थानिक एसआयएलसी

स्थानिक एसआयएलसी

SIILC च्या लोगोसह वापरावी

किचन गार्डनविषयी मार्गदर्शन

कोल्हापुरात २७ मे रोजी विशेष कार्यशाळा

कोल्हापूर, ता. २२ : किचन गार्डन ही उत्तम संकल्पना असून याद्वारे भाजीपाला, सक्युलंन्ट्स व कॅक्टस, फॉलिएज व फुलझाडे व इतर पिके व झाडे घरासाठी पिकवणे शक्य आहे. आजकाल सर्वजण आहाराबाबत चौकस झालेले असल्याने रोजच्या खाण्यात ताजा आणि विषमुक्त भाजीपाला हवासा वाटतो. या पद्धतीने भाजीपाला आपण कसा पिकवू शकतो व शोभेची इतर झाडेही घरच्या घरी तयार करू शकतो. काय आहे ही पद्धत व संकल्पना? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी एक दिवसीय कार्यशाळा कोल्हापूर येथे शनिवारी (ता. २७) आयोजित करण्यात आली आहे.
टेरेस गार्डन, बाल्कनी गार्डन, इनडोअर भाजीपाला गार्डन, आउटडोअर भाजीपाला गार्डन, जनरल किचन गार्डन आदी प्रकारांविषयी यामध्ये मार्गदर्शन केले जाईल. टेरेस वा घराजवळील जागेत भाजीपाल्याशिवाय हंगामी कोणकोणती फुलझाडे व शोभेची झाडे आपण लागवड करू शकतो, त्यासाठीचे नियोजन, माती व कुंड्या भरण्याची पद्धती तसेच अन्नद्रव्य आणि रोग-कीड नियंत्रण, हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, एक्वापोनिक्स आदींविषयीही मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच कलम कसे करावे, कलमांच्या विविध प्रकारांची माहिती देखील मिळणार आहे. घरातल्या घरात लागवड केलेल्या सेंद्रिय भाज्यांचे आरोग्यदायी फायदे, अन्न सेवनाचे प्रमाण, वैद्यकीय फायदे तसेच आर्थिकदृष्ट्या लागवड कशी करावी याविषयीही माहिती दिली जाईल. लागवडीसाठी आवश्यक प्रकाश, जागा, पाणी, रोपे, वनस्पती पोषण याविषयीही सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.

चौकट
कार्यशाळेत काय शिकणार

- किचन गार्डनचे प्रकार त्यासाठीचे नियोजन व पूर्वतयारी
- मानवी आहारासाठी आवश्यक भाजीपाला व लागवड
- शोभेची झाडे व त्याचे प्रकार
- माती व सेंद्रिय खतांचे नियोजन
- कुंड्या, वाफे भरण्याची शास्त्रोक्त पद्धती
- भाजीपाल्याची शास्त्रोक्त लागवड
- सेंद्रिय पद्धतीने कीड-रोगांचे नियंत्रण

०००
प्रतिव्यक्ती शुल्क- १५०० रुपये
कार्यशाळेचे ठिकाण- सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिरजवळ, कोल्हापूर
नोंदणीसाठी संपर्क- ९१४६०३८०३१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com