दाभोळ खाडीतील औद्योगिक विकासाला चालना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ खाडीतील औद्योगिक विकासाला चालना
दाभोळ खाडीतील औद्योगिक विकासाला चालना

दाभोळ खाडीतील औद्योगिक विकासाला चालना

sakal_logo
By

४२ (पान ३ साठी, मेन)

- rat२२p२६.jpg-
२३M०४३२६
गुहागर ः गोपाळगडावरुन दिसणारा दाभोळ खाडी व समुद्राच्या मुखावर असलेला वाळुचा पट्टा.

----

राष्ट्रीय जलमार्गात दाभोळ खाडी........लोगो

दाभोळ खाडीच्या औद्योगिक विकासाला चालना

विठ्ठल भालेकर ; वाळुचा पट्टा हटविण्याचे काम वेगाने व्हावे

------
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २२ : एप्रिल आणि मे या दोन महिन्यात केंद्रीय मंत्री पटेल आणि रुपाला यांचे गुहागर तालुक्यात दौरे झाले. या दौऱ्यांमुळेच गेल्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. किमानपक्षी केंद्र सरकारपर्यंत हा विषय आला. वाळुचा पट्टा हटविण्याचे काम वेगाने झाल्यास दाभोळ खाडीतील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल तथा बावा भालेकर यांनी व्यक्त केली.
भालेकर म्हणाले की, दाभोळ खाडीच्या मुखावर म्हणजे वाशिष्ठी नदी समुद्राला मिळते तेथे धरणाच्या बांधासारखा एक मोठा वाळुचा पट्टा (गाद) तयार झाला आहे. त्यामुळे दाभोळ, वेलदूर, नवानगर, धोपावे येथील मच्छीमार नौकांना डोंगराच्या बाजुने अरुंद, लाटा उसळणाऱ्या भागातून समुद्रात मच्छीमारीसाठी जावे लागते. समुद्रात गेलेल्या नौकांना खाडीत येताना भरती ओहोटीचा अंदाज घेवूनच आत यावे लागते. या धोकादायक वाहतुकीमध्ये अनेकवेळा खाडीच्या मुखावर अपघात झाले आहेत. अनेकवेळा उसळणाऱ्या लाटांमुळे नौका खडकावर आपटून त्यांना जलसमाधी मिळाली आहे. पाच वर्षांपूर्वी दाभोळ खाडीतील वाळु बार्जद्वारे मुंबई, गुजरात पर्यंत नेण्याचा व्यवसाय सुरु होता. यातील काही बार्ज वाळुच्या पट्ट्यात अडकली. त्यामुळे हा व्यवसाय बंद झाला. त्याचप्रमाणे दाभोळ खाडीत जहाज बांधणीचे दोन प्रकल्प सुरु झाले होते. मात्र मोठी जहाजे खाडीत येऊ न शकल्याने हे प्रकल्प बंद पडले. त्यातून स्थानिकांना मिळणारा रोजगार बुडाला. सदर वाळुचा पट्टा हलविल्यास मच्छीमारांचा धोकादायक प्रवास संपेल. पूर्वीप्रमाणे दाभोळ, वेलदूर बंदरात मच्छीमार नौकांची यातायात वाढेल. वादळी परिस्थितीत अनेक नौकांना दाभोळ खाडीत सुरक्षितपणे नौका उभ्या करता येतील. प्रवासी जल वाहतुक निर्धोकपणे शकल्याने मुंबई दाभोळ, गोवा दाभोळ जलवाहतुकीला चालना मिळेल. दाभोळ खाडीतील औद्योगिक विकासाला चालना मिळेल. हे मुद्दे गेली ६-७ वर्ष केंद्र सरकारला केलेल्या पत्रव्यवहारातून सांगितले होते. दोन मंत्र्यांच्या प्रवासामुळे या विषयाला गती मिळाली.
------
परिणाम काय झालाय...

* दाभोळ, वेलदूर आदीच्या नौकांना धोका
* लाटा उसळणाऱ्या भागातून प्रवास सक्तीचा
* मुंबई, गुजरातपर्यंत जाणारे बार्ज झाले बंद
* जहाज बांधणीचे दोन प्रकल्प पडले बंद

फायदा काय होणार
* मच्छीमारांचा धोकादायक प्रवास संपेल
* नौकांमुळे बंदरे गजबजतील, व्यापार वाढेल
* जलवाहतुकीला चालना मिळेल
* शेकडोंना रोजगार संधी मिळतील