दाभिलमध्ये ट्रान्सफार्मरची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभिलमध्ये ट्रान्सफार्मरची मागणी
दाभिलमध्ये ट्रान्सफार्मरची मागणी

दाभिलमध्ये ट्रान्सफार्मरची मागणी

sakal_logo
By

दाभिलमध्ये ट्रान्सफार्मरची मागणी
ओटवणे ः दाभिल येथील कमी क्षमतेच्या तसेच जीर्ण झालेल्या ट्रान्सफार्मरमुळे ग्राहकांसह शेतकरी व बागायतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी त्वरीत नवीन १०० केव्हिचा ट्रान्सफार्मर मंजूर करून विजेच्या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी दाभिल ग्रामस्थांच्यावतीने दाभिलचे ग्रामपंचायत सदस्य हनुमंत जाधव यांनी केली आहे. जीर्ण झालेल्या या कमी क्षमतेच्या या ट्रान्सफार्मरमुळे घरातील फ्रिज, वॉशिंग मशीन, विद्युत उपकरणे चालत नाहीत तसेच मोटर पंप यांनाही आवश्यकता क्षमतेचा वीज पुरवठा होत नसल्याने पंप सुरू होत नाहीत. पर्यायाने ग्राहकांसह शेतकरी व बागायतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी त्वरीत नवीन १०० केव्हिचा ट्रान्सफार्मर बसवावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
-----------
मालवण येथे गुरुवारी सभा
मालवण : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, मालवणची मासिक सभा गुरुवारी (ता.२५) सायंकाळी पाचला भरड येथील हॉटेल लिलांजली हॉल येथे आयोजित केली आहे. या सभेला प्रजापती ब्राह्मचारी यांचे अनुयायी मार्गदर्शन करणार आहेत. सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे.