चाकरमान्यांचा प्रवास ‘वेटिंग लिस्टवर’

चाकरमान्यांचा प्रवास ‘वेटिंग लिस्टवर’

04425
कणकवली ः मुंबईकडे जाणारे चाकरमानी परतीच्या मार्गावर लागल्याने रेल्वे स्थानकात झालेल्यी प्रवाशांची गर्दी (छायाचित्र ः तुषार सावंत)


चाकरमान्यांचा प्रवास ‘वेटिंग लिस्टवर’

‘कोरे’चे आरक्षण फुल; अमाप गाड्या, नियोजनाचा अभाव

कणकवली,ता. २३ ः कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या आणि उन्हाळी हंगामासाठी सोडलेल्या जादा गाड्यांचे नियोजन बिघडल्यामुळे परतीच्या प्रवासातही चाकरमान्यांना हाल सहन करावे लागत आहेत. उन्हाळी हंगामातील सुटीची मौजमजा लुटून चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत; परंतु, हा प्रवास वेटिंग लिस्टवरच करावा लागत असल्याने कणकवलीसह रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येक स्थानकात प्रवाशी डब्यात प्रवेश केल्यानंतर चेंगाराचेंगरी होत असल्याचे चित्र आहे.
कोकण रेल्वे मार्गावर नियमितपणे मांडवी एक्स्प्रेस, दिवा पॅसेंजर, तुतारी एक्स्प्रेस, मंडगाव एलटीटी, जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगलोर एक्स्प्रेस, कोकण कन्या एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस धावत असतात. तसेच दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्याही गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळी हंगामासाठी १२ गाड्या ये- जा करत आहेत. तरीही प्रवाशांना प्रतीक्षा यादीकडे पहात राहावे लागत आहे. बहुतांशी प्रवासी हे आगाऊ आरक्षण करतात; मात्र, रेल्वेमध्ये १२० दिवस आगाऊ आरक्षण करूनही कन्फर्म तिकीट मिळत नाही ही व्यथा कायम आहे. यंदा आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाचा असाच बोजबारा उडाला आहे. त्यामुळे आता मुंबईच्या चाकरमान्यांनी परतीच्या प्रवासातही हालअपेस्टा सहन कराव्या लागत आहेत. एप्रिलमध्ये आलेले चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. अजूनही मुंबईवरून प्रवाशी गावाकडे येत आहेत. साधारण जूनच्या दहा तारीख पर्यंत परतीच्या प्रवासाचे आरक्षण पूर्ण झाले आहे. शाळा, महाविद्यालय यंदा १५ जून रोजी सुरू होत आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामातील ज्यादा गाड्या जूनच्या पहिल्या आठवड्या पर्यंत धावणार आहेत. त्यानंतर नियमित गाड्या धावणार आहे. सध्या कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या असल्या तरी प्रवाशांची गर्दी अमाप आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रतीक्षा यादी वरूनच प्रवास करण्याची वेळ आली आहे.
-----------
कोट
कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगामात, दिवाळी, नाताळ सनातही रेल्वेची तिकीटे मिळत नाहीत. रेल्वे सुरू झाल्यानंतर पंधरा वर्षांतील परस्थिती बदललेली नाही. रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले. गाड्यांचा वेग वाढला हे समाधान आहे; पण रेल्वेचे तिकिट आगावू आरक्षण करूनही मिळत नाही, ही खंत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील प्रवाशांचा रेल्वेने विचार करावा.
- वामन राणे, रेल्वे प्रवाशी, मुंबई-बोरिवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com