आचरण एखाद्या टॉनिकसारखं काम करणारं

आचरण एखाद्या टॉनिकसारखं काम करणारं

११ ( टुडे पान २ )

(९ मे पान दोन)

- rat२३p५.jpg-
२३M०४४३२
निरंजन दीपक गोखले

निरोगी राहण्याचा मंत्र ः आयुर्वेद
--
आयुर्वेद हे नुसतं रोग आणि औषध एवढ्या पुरत मर्यादित वैद्यकशास्त्र नसून ते जीवन जगण्याचं ज्ञान आहे. रोग होऊ नयेत म्हणून कशाप्रकारे वागाव हे सांगतानाच थोडक्यात हे अशा प्रकारे नियमात राहून वागला नाहीत तर रोग होण्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. हे नियम तोडलेत तर रोगरूपी शिक्षा ही होणारच हे अगदी स्पष्टपणे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. इतके दिवस या लेखमालेत आपण दिनचर्या म्हणजे एक क्रमबद्ध विहार बघितला अगदी सकाळी किती वाजता उठाव इथपासून शौच, दंतधावन,अभ्यंग, व्यायाम, उद्वर्तन,स्नान इत्यादी गोष्टी त्या अशाच का करायला हव्यात, त्या क्रमानेच का करायला हव्यात हे आपण पाहिलं, पण इतकं नीट आवरून जर आपलं आचरण नीट नसेल तरीही आपण विविध रोगांना बळी पडू शकतोच. म्हणून आपलं आचरण,वागणूक,समाजात वावरताना पाळायचे नियम, (एटिकेट्स) हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. त्याला आचार्यांनी सद्वृत्त म्हणजे सत (चांगलं) वर्तन, चांगली वागणूक असं नाव दिलं आहे. आणि असंच सव्दर्तन नियमितपणे करणे याला आचार रसायन म्हटलं आहे.

वैद्य निरंजन दीपक गोखले,रत्नागिरी

---
आचरण एखाद्या टॉनिकसारखं काम करणारं

आचार म्हणजेच आचरण. (लोणचं नाही) चांगलं आचरण नियमितपणे एखाद्या टॉनिकसारखं काम करणार आहे म्हणून त्याला आचार रसायन म्हटलं गेलंय. यात जे मॅनर्स एटीकेट्स सांगितले आहेत तो काळ आहे काही हजार वर्षांपूर्वीचा. पण आजच्या काळातही ते अतिशय चपखल बसतात. यात अशी एकही गोष्ट नाही जी आजच्या काळाला अनुसरून नाही किंवा आजच्या काळात तिचा विचार करताना ती कालबाह्य वाटेल. तर बघूया मग आपल्या आचार्यांना, आयुर्वेदाला कोणते मॅनर्स एटीकेट्स अपेक्षित आहेत.
अधर्माने वागू नये धर्मपर व्हावे. इथे धर्म म्हणजे रिलीजन नाही बरं. अधर्माने म्हणजे दुष्टपणाने, वाईट मार्गाने, अनितीने अर्थ, काम म्हणजेच जे पैसे कमवायचे आहेत ,जे इच्छित प्राप्त करायच आहे ते नियमाने वागूनच, कायद्याच्या चौकटीत राहूनच, वैध मार्गाने करावे.अवैध, वाम मार्गाने म्हणजेच भ्रष्ट होऊन, भ्रष्टाचार करून,फसवणूक करून, एखाद्याची पिळवणूक, शोषण करून, नियमांच्या बाहेर जाऊन, लांडी लबाडी करून अर्थप्राप्ती करू नये. कारण सुख हे धर्मपरं राहण्यातच आहे. इथे आर्थिक आणि इच्छित कामनापूर्ती करण्याबरोबरच धर्म म्हणजे आयुर्वेदाला अपेक्षित जेवणाचे वागण्याचे ऋतूनुसार खाण्यापिण्याचे नियम सुद्धा अपेक्षित आहेत. अन्यथा रोगरूपी दुःख हे होणारच आहे म्हणूनच, "सुखंच न विनाधर्मात तस्मात धर्मपरोभवेत".इथे सुख म्हणजे व्यावहारिक जगातलं सुख तर आहेच पण आयुर्वेदाला अपेक्षित सुख म्हणजेच निरोगीत्व सुद्धा अपेक्षित आहे.
कल्याण मित्र म्हणजे आपल्या चांगल्या च चिंतन करतात किंवा जे नियमाने वागणारे आहेत असेच मित्र संगतीला असावेत असं सांगितलं आहे. कुबुद्धी असणारे,व्यसनी, आपल्यालाही वाईट सवयी लावणारे स्वतःबरोबर आपल्यालाही गोत्यात आणतील अशा लोकांपासून लांब राहावे. आपण चुकत असताना आपल्याला जे योग्य मार्गावर आणतात, सुधारण्याची इच्छा धरून आपल्याला खडसावतात असे आपले हितचिंतन करणारे अशा मित्रांची संगत करावी इतरांची संगत सोडून द्यावी इतका व्यावहारिक विचार सुरुवातीलाच सांगितला आहे.
यापुढे दहा प्रकारची पाप कर्म कायिक, वाचिक आणि मानसिक पाप कर्म कधीही करू नयेत असे आयुर्वेद सांगतो.
१.हिंसा- शारीरिक किंवा मानसिक त्रास देणे मारून टाकणे अशा प्रकारच्या हिंसा, उपद्रव देण्यासाठी म्हणून करू नयेत पण आपल्याच जीवावर कोणी उठला असेल तर स्वसंरक्षणासाठी हिंसा जरूर करावी .
२.स्तेय - म्हणजेच चोरी. कोणत्याही प्रकारची चोरी करू नये. प्रत्यक्ष द्रव्याची चोरी राहू दे बाजूला आजकाल फेसबुक व्हाट्सअप वर लेख सुद्धा नाव बदलून चोरतात लोक..
३.अन्यथा काम- म्हणजेच निषिद्ध कामसेवन, विकृत इच्छांची पूर्तता. पशु बरोबर मैथुन इत्यादी तीव्र काम इच्छे तुन वाटेल त्या थराला जाण्याची प्रवृत्ती या गोष्टी करू नयेत .
४.पैशून्य म्हणजेच चहाडी. लावा लावी करणे. यामुळे किती जणांची मने कलुषित होऊन चांगले संबंध दुरावतात त्यामुळे हे पाप करू नये.
५. परुष- म्हणजेच कठोर वचन दुसऱ्याला लागेल असे बोलणे. शक्यतो समोरच्याला लागेल असं बोलून दुखावू नये त्याचा यदाकदाचित उद्या आपल्यालाही त्रास होऊ शकतो आणि नात्यांमध्ये तेढ निर्माण होऊन विविध मानसिक आजार होऊ शकतात. मनाच्या आजाराचा परिणाम शरीरावर होऊन हृदयावरही परिणाम होऊन विविध रोग होऊ शकतात त्यामुळे ते टाळावे .
६.अनृत- खोटे बोलणे. व्यक्तिगत स्वार्थासाठी स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी खोटे बोलणे हे सुद्धा पाप आहे. त्यापेक्षा चूक मान्य करून खरं बोलावं कारण एक खोटे लपवण्यासाठी शंभर वेळा खोटे बोलावे लागते. एखाद्याच्या भल्यासाठी, समाजाचं चांगलं होतंय तर, खोटं बोलणं चालू शकतं पण तात्कालीक वैयक्तिक सुखासाठी खोटं बोलू नये.
७.संभिन्न आलाप - बढाई खोर किंवा असंबंध बडबड करू नये. बाकीचे लोक उद्विग्न होतात व इष्ट कार्य साधण्याऐवजी नुकसानच होते म्हणून किती जरी ज्ञानी असलो तरी योग्य आणि कमीत कमी शब्दात आपला मुद्दा मांडावा.
८.व्यापाद - दुसऱ्याचे वाईट चिंतणे. जे खरोखरीच वाईट आहेत त्यांचा नाश व्हावा, समाजकंटकांचा नाश व्हावा असं नुसत चिंतन करत बसू नये. त्यापेक्षा आपलं सामर्थ्य तेवढे असेल तर ती कृती करून शांत रहावं. जर नुसतच आपण विचार करत बसलो की एखाद्याचं वाटोळ होऊ दे तर त्या निगेटिव्ह विचारांचा परिणाम आपल्यावर होऊन आपलं मन नकारात्मक बनु शकते .त्यामुळे जर एखाद्या वाईट माणसाचं वाईट व्हावं किंवा त्याला शिक्षा व्हावी असं वाटत असेल तर तो योग्य मार्ग अवलंबाबावा. नुसतच चिंतन करत बसू नये. तसेच दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न झाल्याने त्याचं वाईट नक्कीच चिंतू नये .यासारखे दुसरे पाप नाही. ते boomerang होऊन कधी उलटेल समजणार नाही.
९.अभिध्या- दुसऱ्याच्या संपत्तीची इच्छा करणे. म्हणजेच दुसऱ्याचं आपल्याला मिळावं त्याचं वाटोळ व्हावं अशी विकृत इच्छा करणे. त्यापेक्षा तो कोणत्या मार्गाने श्रीमंत झाला ते आपण करावे.,कष्ट करावे अशी इच्छा करावी. दुसऱ्याचा आपल्याला फुकट मिळेल असं चिंतू नये.
१०.दृग्विपर्यय - म्हणजे शास्त्र विपरीत दृष्टी. म्हणजेच शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास न ठेवणे. इथे शास्त्र म्हणजे आयुर्वेद शास्त्र अपेक्षित आहे. कारण या गोष्टींवर विश्वास न ठेवता जर मनमानी केली तर अनारोग्यच पदरी पडेल. म्हणून आस्तिक दृष्टी आस्तिक बुद्धी ठेवून नियमाने वागले तर शरीर निरोगी राहील.
ही पापकर्मी सगळ्यांना सगळ्या अवस्थांमध्ये पापकर्मच राहतील असे नाही. उदाहरणार्थ आपल्या सैनिकांनी शत्रू राष्ट्रातील सैनिकांना, दहशतवाद्यांना मारले तर ती हिंसा पापकर्म होत नाही. आपण पेशंटचं मानसिक बल ढासळू नये म्हणून त्याला रोगाच्या खऱ्या स्वरूपाबद्दल थेट सांगितलं नाही तर ते खोटं बोलणं पाप होत नाही म्हणून सारासार विचार करता व्यक्तिगत स्वार्थासाठी जर या गोष्टी केल्या तर त्या पाप या सदरात मोडतात पण एखाद्याच्या, समाजाच्या,देशाच्या भल्यासाठी हितासाठी यातल्या काही गोष्टी केल्या तर त्या पाप ठरत नाहीत म्हणूनच तारतम्याने वागावे.
(लेखक वाग्भट चिकित्सालय, रत्नागिरी आयुर्वेद चिकित्सालय, आडिवरे येथे कार्यरत आहेत.)
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com