ः किफायतशिर उद्योग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ः किफायतशिर उद्योग
ः किफायतशिर उद्योग

ः किफायतशिर उद्योग

sakal_logo
By

१२ ( टुडे पान ३ )
१७ मे टुडे तीन
---------
- rat२३p४.jpg-

२३M०४४३१
प्रसाद जोग

धरू कास उद्योजकतेची..............लोगो

फार वर्षांपूर्वी स्वतःच्या जागेच्या क्षेत्र निश्चितीसाठी किंवा शेतीच्या संरक्षणासाठी ग्रामीण भागात शेतकरी पावसाळ्याच्या तोंडावर आपल्या जागेच्या सीमेवर मोके पुरून किंवा निवडुंग पुरून साधे किंवा काटेरी कुंपण करायचे. कुंपण बांधणी हे तसे कौशल्याचे व मेहनतीचे काम. कुंपणाची निगराणी राखण्यासाठी कुंपणामधील झाडा झुडूपांची काळजी घेऊन योग्य वेळी त्यांची छाटणी करणे , कुंपणाची गुणवत्ता टिकवून ठेवणे, सैल झालेले दोर बांधणे असे व्यवस्थापन ग्रामीण भागातील शेतकरी, महिला मोठ्या हौसेने व कलात्मकतेने करत असत. हिच कला आजही शिकून घेऊन तिचे व्यावसायिक तत्वावर "जैविक कुंपण बांधणी व व्यवस्थापन" या किफायतशिर उद्योगात रूपांतर करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या ग्रामीण भागातील पण मोल मजुरी करण्याची तयारी असलेल्या आणि स्वतः प्रमाणेच अधिकचे मनुष्य बळ ( मानव संसाधन) म्हणून या कामाला लागणाऱ्या कष्टकरी व शेती कामाची आवड असणाऱ्या युवा वर्गाला संघटित करू शकतील अशा प्रकारच्या उद्योजकीय मानसिकतेच्या व्यक्तींना प्रेरित करण्याची कशी गरज आहे याचा हा उहापोह

प्रसाद जोग,चिपळूण
---

जैविक कुंपण ः किफायतशिर उद्योग

आपल्या जिल्ह्यात नव्याने जागा घेणाऱ्याना, फळ बागा विकसित करणाऱ्यांना, शेती करणाऱ्यांना, गुरांच्या वैरणी साठी राब राखणाऱ्याना, वरकस जमिनी घेऊन विकसित करणाऱ्यांना, ज्यांची तारांची, जाळींची कुंपणे जीर्ण झाली आहेत त्यांना, ज्यांचे बांध, कसू ढासळले आहेत व त्याचा पुनर्बांधणी खर्च जास्त येऊ शकतो म्हणून पर्यायी व्यवस्थेच्या शोधात असणाऱ्यांना, हौस म्हणून आपल्या सेकंड होम भोवती बायो फेंसिंग असावं किंवा बांबू फेंसिंग असावं अशी इच्छा असणाऱ्याना तसेच अर्ध बंदिस्त पद्धतिने गो पालन, शेळी पालन करू इच्छिणाऱ्याना जैविक कुंपण करण्यासाठी साधन सामुग्री, मोके, फुटावे, कंद, वेली कुठून आणायची याची निश्चित माहिती नसते. कुंपण स्वतः तयार करण्यासाठी पुरेसे मनुष्य बळ असतेच असे नाही याच गोष्टींची गरज ओळखून दूरदृष्टीने ग्रामीण भागातील फॉरेस्ट्री किंवा Agriculture चे प्रशिक्षण घेतलेले तरुण तरुणी हा थोडासा वेगळा पण आजच्या घटकेला अत्यंत गरजेचा असा निड बेस बायो फेन्सिंग डेव्हलपमेंट चा उद्योग व्यवसाय स्वतःच्या मेहनतीने, नियोजन कौशल्याने सुरू करू शकतात. या पावसाळ्याच्या सुरवातीलाच जरी हा व्यवसाय सुरू करायचा विचार जरी कोणी केला तरी त्यांना तो सहजतेने व आत्मविश्वासाने करता येऊ शकेल.
हा व्यवसाय सुरू करत असताना हा एकट्याने करता येण्यासारखा व्यवसाय नक्कीच नाही हे मात्र लक्षात ठेऊन आपल्या सोबतीला शेतीची आवड असणारी कमीत कमी पाच ते दहा जणांची टीम हवी. येणाऱ्या काळात आपल्याला आपल्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी पर्यावरण स्नेही नैसर्गिक ,जैविक साधन समुग्रीचा , स्रोतांचा वापर करावा लागणार आहे आणि त्याची सुरवात आपल्याला अगदी अंगणातल्या कुंपणापासूनच करावी लागेल असे आपल्या संभाव्य ग्राहकांना आपल्या या क्षेत्रातील नव उद्योजकांना समजावून सांगावे लागेल.
ग्रामीण भागात स्थायिक असलेल्या, स्वतःची मालवाहू गाडी असलेल्या आणि शेती अवजारे असणाऱ्या ग्रामीण तरूणांना अगदी शून्यातून उभारता येऊ शकणारा उद्योग म्हणजे हा जैविक कुंपण व्यवस्थापन व वार्षिक देखभाल. हा वेगळ्या धाटणीचा पण चांगली आर्थिक उलाढाल होऊ शकणारा उद्योग होय.जैविक कुंपण तयार करण्यासाठी सर्वात आधी जागेचे स्वरूप , कुंपणाला वापरायची झाडे, झुडपे, शेती मालकाची कुंपणाची गरज, कुंपणाची उपयुक्तता या सर्वांचा अभ्यास करून मगच कुंपण करायला घ्यावे लागते. शेताच्या किंवा जागेच्या सीमेवर किंवा हद्दी वर लावलेल्या झाडांच्या किंवा झुडपांच्या एक रेषिय, जास्त घनतेच्या पण जैवविविधता जपणाऱ्या वनसंपदे मुळे जागा मालकाला ही कुंपणात असणाऱ्या झाडा झुडपांचा आर्थिक उपयोग होऊ शकतो. गुरेढोरे आणि वन्यजीवांपासून जैविक कुंपणे संरक्षण तर देतातच, पण वाऱ्याच्या झोताला नियंत्रित करण्याचेही काम करतात, तसेच या कुंपणातील असलेल्या झाडापासून तयार होणाऱ्या बायो वेस्टचा उपयोग खतासारखा शेत मालकाला करून देता येऊ शकतो. मातीची धूप थांबून मृदा समृद्ध होण्यासाठी मदत होऊ शकते. मधमाशांना, पक्षांना आकर्षित करू शकणारी हिरवळ तयार होते. त्यामूळे निसर्ग सोबत वाढते हे ही जैविक कुंपण करू इच्छिणाऱ्या जागा मालकांना समजावून देणे संयुक्तिक ठरते.
कुंपणाची कॅनोपी व्यवस्थित ठेवल्यास ती सावली तर देतेच पण त्यामुळे धूळही नियंत्रित राहते. लाकूड, काटेरी तार, जाळी, सिमेंट पोल किंवा दगडी तसेच जांभ्याच्या कसूच्या बांधकामाच्या खर्चापेक्षा जैविक कुंपणाचा बांधणी खर्च तुलनेने कमी येत असल्याने व जैव विविधता संतुलित राहण्यास मदत होत असल्याने जैविक कुंपण तयार करण्यासाठी कोकणात शेतकरी, बागायतदार,जागा मालक आकर्षित होऊ शकतात.
पांगारा, निगडी, निवडुंग, करवंद, मेहंदी, बोगनवेल, गिरीपुष्प, चाफा, निलगिरी, घायपात, बांबू, शेवरी, साग, अडुळसा, एरंड, काडी हुर्या, सागरगोटा या वनस्पतींचा उपयोग होऊ शकतो.
जैविक कुंपण तयार करून द्यायच्या कामात पैसा चांगला मिळणार असला तरी कुंपण मजबूत ,आकर्षक, दिर्घकालीन टिकणारे व जागा मालकाच्या गरजांची पूर्तता करणारे हवे. जैविक कुंपण तयार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची जागा मालकाला स्पष्ट कल्पना देऊन, व योग्य बजेटचा अंदाज देऊन जागा मालकाच्या मौखिक किंवा लिखित स्वरूपातील अनुमति नंतर व झाडांच्या मोक्यांची , वाणांची,बियांची उपलब्धता पाहून मगच कुंपण बांधणी चे काम हाती घ्यावे.
गुणवत्ता, पारदर्शकता, स्पष्टवक्ते पणा, नियोजन कौशल्य, नेतृत्व शैली, सांघिक काम करण्याची क्षमता व कुंपणासाठी योग्य झाडांची ओळख करून घेण्याची जिज्ञासा या धंद्यात उपयुक्त ठरू शकते. जैविक कुंपणासाठी लागणारी झाडे आपल्याच नर्सरीत तयार केल्यास ग्राहकांना सातत्यपूर्ण पुरवठा करण्यास उद्योजकांना जमू शकते. जैविक कुंपण तयार करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचा,मनुष्य बळाच्या मजुरीचा,आपल्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चा एकत्रित आढवा घेऊन उद्योजकाने कुंपण निर्मिती साठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज आपल्या ग्राहकाला कामाच्या आधी देणे या उद्योगात गरजेचे आहे. बायो फेंसींगच्या या नव्या क्षेत्रात उद्योजक म्हणून नावारुपाला येण्यासाठी सुरवातीच्या उमेदीच्या दिवसात संयम ठेवून कष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटी मात्र असायला हवी.

(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)