-रिक्षाचालक दिनेश सकपाळ यांचा प्रामाणिकपणा

-रिक्षाचालक दिनेश सकपाळ यांचा प्रामाणिकपणा

१५ (टुडे पान ३ साठी)


- rat२३p१.jpg-
२३M०४४३३
साखरपा : कुंदा दाभोळकर यांना पर्स परत करताना रिक्षा चालक दिनेश सकपाळ.
---
रिक्षाचालक सकपाळ यांचा प्रामाणिकपणा

साखरपा, ता २३ : साखरपा येथील रिक्षा चालक यांनी महिला प्रवाशाची पर्स परत करत प्रामाणिकपणा दाखवला आहे. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील रिक्षा चालक दिनेश उर्फ बबन सकपाळ हे रिक्षा व्यावसायिक भडकंबा येथे भाडे घेऊन गेले होते. त्याच दरम्यान परत येताना भडकंबा दत्तवाडी येथील रस्त्यावर पैसे असलेली पर्स त्यांना सापडली. सकपाळ यांनी पर्स मालकाचा शोध घेण्यास सुरवात केली व तसे आपल्या सहकारी रिक्षा चालकांना माहिती दिली. त्यामुळे मूळ पर्स मालकापर्यंत पोहचण्यास मदत आली. श्रीमती कुंदा यशवंत दाभोलकर या साखरपा आठवडा बाजारात जात असताना त्यांची पर्स हरवली असल्याची माहिती बबन सकपाळ यांनी मिळाली. त्यांनी लगेच कुंदा दाभोलकर यांच्याशी संपर्क साधून पैसे असलेली पर्स त्यांना परत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com